कमर्शियल सिलिंडर दरात घट 183.50 रुपयांनी स्वस्त
किलो वजनाच्या सिलिंडर दरातही कपात ► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली व्यावसायिक (कमर्शियल) उपयोगाच्या गॅस सिलिंडरच्या दरात 183.50 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 5 किलो वजनाच्या सिलिंडरचा दरही घटविण्यात आला आहे. त्यामुळे उद्योगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. घरगुती स्वयंपाक सिलिंडरच्या दरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे इंधन तेल आणि इंधन वायूचे दर…
