Headlines

Tukaram Mundhe Share His 21 Years Old Experience About Amravati


आयएएस तुकाराम मुंढे यांच्या संवादाचा कार्यक्रम शनिवारी (1 ऑगस्ट) अमरावतीत आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात तुकाराम मुंढे यांनी 21 वर्षांपूर्वी आपण अमरावतीत युपीएससी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो. त्यावेळचा किस्सा तुकाराम मुंढे यांनी सांगितला.

Tukaram Mundhe
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमरावती : “2005 साली मे महिन्यात यूपीएससी परीक्षेचा अंतिम निकाल समोर आला होता. मला तो दिवस अजूनही आठवतो. 11 मे 2005 या दिवशी निकाल लागला होता. त्यावेळेस मी एमपीएससीमध्ये पास होऊन महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिस ग्रुप बीचं ट्रेनिंग घेत होतो. त्यादिवशी निकाल लागल्यानंतर संध्याकाळी चारच्या सुमारास मला तो निकाल समजला. त्यावेळी बरोबर असलेले क्लास वन अधिकारी मला मी क्लास टू होतो, क्लास वन अधिकारी आधी तुकाराम म्हणून हाक मरायचे. पण चार वाजता सर म्हणून हाक मारायला लागले”, असा किस्सा आयएएस तुकाराम मुंढे यांनी सांगितला.

“सांगायचा मुद्दा एवढाच आहे की, एका सेकंदात समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन 360 डिग्रीने चेंज होतो. ही ताकद विचारांमध्ये, आचरणात आणि परिस्थिती बदलण्यात असते. पण आपल्याला यश आलं, एखादं पद प्राप्त झालं की आपण हुरळून जायचं नसतं. आपल्या तत्व आणि मुल्यांशी तडजोड करायची नाही. तोच धागा धरुन महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना भेटण्यासाठी गेलो”, अशी आठवण तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.

“त्यावेळी मी अमरावतीतही त्या काळात आलो होतो. विशेष म्हणजे अमरावतीत एका चौथी-पाचवीतील विद्यार्थिनीने भाषणातून प्रेरणा घेतली आणि दोन वर्षांपूर्वी त्या युपीएससी परीक्षा पास झाल्या आणि रिव्हेन्यू डिपार्टमेंटला कार्यरत झाल्या, अशा माहिती वृत्तपत्रांमधून समजली. पण त्याचं क्रेडिट मला नाही तर त्या विद्यार्थिनीला आणि तिच्या पालकांना जातं. आज 21 वर्षांनी मला इथे बोलावलं म्हणून त्या आठवणी जागी झाल्या. त्यामुळे मी त्यावेळचा क्षण आपल्यासोबत शेअर केला”, असं तुकाराम मुंढे म्हणाले.

“आपल्या प्रवासात अनेक चढ-उतार येतात. पण परिस्थितीनुसार त्याचा सामना करायचा. प्रत्येकाने जीवनात जेव्हा चढ-उतार येतात तेव्हा वाहत जायचं नसतं. वाहत जाणं हा सर्वात मोठा धोका आहे”, असं तुकाराम मुंढे म्हणाले.

तुकाराम मुंढे काय-काय म्हणाले?

“आपण आज 21 व्या शतकात चौथ्या क्रांतीची नांदी बोलतो, AI, मशिन लर्निंग या युगात नोकऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणात गदा आलेली आहे, असं आपण म्हणतो. विचार करा, अठराव्या शतकातही पहिली औद्योगिक क्रांती आली तेव्हादेखील हाच प्रश्न होता की, नोकऱ्या जातील, कर्मचाऱ्यांचं काय होणार?”

“नंतर दुसरी औद्योगिक क्रांती झाली त्यावेळेस सांगितलं की, आता ऑटोमेशन होईल, आता पूर्णपणे शेती उद्ध्वस्त होईल. तिसरी औद्योगिक क्रांती संगणकाची आली. त्यावेळेस सांगितलं गेलं की, माणसाची गरजच राहणार नाही. आता पुन्हा चौथी औद्योगिक क्रांती आली तर आता माणसाच्या बुद्धीमत्तेपेक्षा मशीनची बुद्धीमत्ता पुढे गेली असल्यामुळे माणासाचं अस्तित्व राहील की नाही? असाही प्रश्न भेडसावत आहे.”

‘बुद्धीमत्तेपेक्षा महत्त्वाचा प्रश्न आपल्यात विवेक आहे का?’

“कदाचित कम्प्युटर, आयटी, एआय यामुळे बुद्धीमत्ता वाढली असेल. पण प्रश्न बुद्धीमत्तेचा नाही. आज बुद्धीमत्तेपेक्षा सर्वांना पडणारा महत्त्वाचा प्रश्न आहे की, आपल्यामध्ये विवेक आहे का? ज्ञान आहे की माहिती आहे? ते असेल तर आपल्याकडे विवेक आहे का? कारण माहिती आज आपल्याला मोबाईलवर मिळते.”

पूर्वी ज्ञान कसे प्राप्त केले जायचे?

“पूर्वी ज्ञान, माहिती घेण्यासाठी ग्रंथालयात जायचो. तिथे पुस्तक वाचायचे, शिक्षकांसोबत चर्चा करायची. एखाद्या विषयावर अभ्यास करायचा असेल तर कोणतं पुस्तक वाचायचं हे शिक्षकांना विचारायचो. मग ते पुस्तक उपलब्ध आहे का? ते बघायचो. ग्रंथालयात जावून ते पुस्तक शोधायचं, त्यातून आपल्याला हवी असणारी माहिती घ्यायची आणि वाचायची.”

“एवढे प्रयत्न माहिती मिळवण्यासाठी करावी लागायची. गावागावत वृत्तपत्रे नव्हते. ग्रंथालय नव्हते. शाळेमध्ये शिक्षक सांगतील किंवा पाठ्यपुस्तक असतील त्यापेक्षा वेगळी काही माहिती नव्हती. आज जगातील सर्व माहिती, अनेक शतकांची माहिती, पुढे काय होईल याची शक्यता काय याबाबतची पूर्ण माहिती आपल्या खिशात स्मार्टफोनमध्ये आहे.”

‘विवेकाची पोकळी निर्माण’

“एवढी माहिती आपल्या खिशात असतानाही आपल्याला अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. का? जेन-झी आणि जेन-अल्फाने करायचं काय? याआधीदेखील तीन औद्योगिक क्रांती झाली. पण नोकऱ्यांचं संकट गडद झालं नाही.”

“नोकरी गेली नाही तर नोकरीचं स्वरुप बदललं. आजही तीच परिस्थिती आहे. म्हणून ज्ञान घेण्यासाठी धडपड करण्याची गरज नाही. ती तुमच्या मोबाईलमध्ये आहे. पण विवेक लपून बसलेला आहे. विवेकाची पोकळी निर्माण झाली आहे. हा सर्वात मोठा प्रश्न आहे.”

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा