मुंबई : भारत आणि आयर्लंडमधील टी-२० मालिकेला सुरूवात होणार असून पहिला सामना आज पार पडणार आहे. या सामन्याकडे वैभव सूर्यवंशीमुळे सर्वांचं लक्ष लागलं असून तो आज अंतिम ११ मध्ये खेळणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. या दोन सामन्यांमध्ये वैभवने त्याच्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी केली तर इंग्लंडविरूद्धच्या टी-२० मालिकेत त्याची जागा पक्की मानली जात आहे. वैभवने आताच श्रीलंकेत झालेल्या तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये ९४ धावांची तुफानी खेळी केली होती. त्यामुळे आज पठ्ठ्याला जर संधी मिळाली तर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा रेकॉर्ड मोडला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा पुरूष खेळाडू ठरणार आहे.
आयर्लंड आणि भारतामधील पहिला टी-२० सामना आज संध्याकाळी सहा वाजता सुरू होणार असून संध्याकाळी साडे पाच वाजता टॉस होणार आहे. या सामन्याचे प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर असणार आहे. तर मोबाईलवर सोनी Soni Live Appवर पाहता येणार आहे. महिला टी-२० वर्ल्ड कप सुरू असल्याने या सामन्यांच्या वेळेत बदल केला असून हे सामने एक तास अगोदर खेळवण्यात येणार आहेत. यासाठी चाहत्यांना लवकरच मॅच पाहावी लागणार आहे. जर नेहमीप्रमाणे सात वाजता सामना पाहायला गेलात तर निराशा होऊ शकते. त्यामुळे सामना संध्याकाळी सहा वाजता सुरू होणार हे चाहत्यांनी लक्षात घ्यायला हवे. IND W vs BAN W : टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघ जिंकूनही ‘हरला’, नेमकं काय चुकतंय? रविवारी शेवटची संधी
वैभवला संधी द्यायची असेल आहे तर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांच्यापैकी कोणा एकाला खाली बसावं लागू शकतं. कारण एकाच वेळी तिन्ही ओपनर्स खेळाडूंना खेळवणं सोपं नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात वरिष्ठ खेळाडूंपैकी कोण खाली बसणार की? वैभवलाच अंतिम ११ मध्ये संधी दिली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भारतीय संघ – श्रेयस अय्यर (C), तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, रवी बिश्नोई, सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, हर्षित राणा, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, प्रिन्स यादव, प्रसिध्द कृष्णा.
आयर्लंड संघ – टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर लॉर्कन टकर (C/WK), गॅरेथ डेलेनी, स्टीफन डोहेनी, जॉर्ज डॉकरेल, बेंजामिन कॅलिट्झ, मॅथ्यू हम्फ्रे, रुबेन विल्सन, गेविन होए, जे मुंद्रा, लियाम मॅककार्थी, मॅथ्यू हॉलर्ड
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा