Headlines

कोकण रक्षणासाठी राखणदार पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

न्हावेली /वार्ताहर : कोकणची समृद्ध निसर्गसंपदा आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी ‘राखणदार सेवा संघा’ तर्फे सुरू असलेल्या ‘राखणदार पदयात्रे’ च्या दुसऱ्या टप्प्याला मळेवाड जकात नाका येथे ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. गावागावांत या पदयात्रेचे जंगी स्वागत केले जात असून, कोकणच्या रक्षणासाठी आता लोकचळवळ उभी राहत असल्याचे चित्र दिसत आहे.कोकण वाचवण्यासाठी जन जागृतीची गरज आहे.सर्वांनी राखणदार होणे आवश्यक…

Read More

सातार्डा पंचक्रोशीत मोकाट गुरांचा यक्षप्रश्न

सातार्डा : सातार्डा पंचक्रोशीमध्ये मोकाट गुरांचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मोकाट गुरांची समस्या सोडविण्यासाठी प्रभारी प्रांताधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील यांचे लक्ष वेधणार असल्याचे जि प सदस्य सुदन कवठणकर यांनी सांगितले.परिसरातील शेतकरी गुरे मोकाट सोडून आरामात रहातात.मोकाट गुरे शेतीचे, व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. दोन्ही मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी मोकाट…

Read More

मयुरेश कदम आणि श्रावणी चव्हाण ठरले ‘मिस्टर व मिस फ्रेशर’ !

मालवण: स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात नुकत्याच प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत व ओरिएंटेशन कार्यक्रम १७ जुलै रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमामुळे महाविद्यालयाचे सभागृह नवचैतन्याने बहरून गेले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांनी…

Read More

‘मिशन आगमन’च्या यशाने गोमंतकीय तरुणांना नवे पंख

मुख्यमंत्री सावंत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे कौतुक पणजी : भारताचे पहिले खासगीरित्या विकसित केलेले कक्षीय रॉकेट ‘विक्रम-1’च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आनंद व्यक्त केला आहे. हे ऐतिहासिक यश म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळ क्षेत्रात राबवलेल्या धाडसी धोरणात्मक सुधारणांचे थेट फळ आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी काल, शनिवारी संध्याकाळी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचे…

Read More

वांगचूक यांना पाठिंब्यासाठी आज पणजीत उपोषण

प्रतिनिधी/ पणजी शिक्षण तसेच पर्यावरण क्षेत्रात महान कार्य केलेले व सध्या नीट पेपर फुटीप्रकरणी दिल्लीत उपोषण करत असलले सोनम वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी आज रविवार दि. 19 रोजी पणजीत आझाद मैदानावर सामाजिक कार्यकर्त्यांकडून लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. वांगचूक यांनीच दिलेल्या हाकेला प्रतिसाद म्हणून हे आंदोलन करण्यात येणार असून प्रसिद्ध नाट्याकर्मी तथा सामाजिक कार्यकर्ते राजदीप नाईक त्याचे…

Read More

सराफी व्यावसायिकाचे ‘पितळ’ उघडे

स्वत:च्याच दुकानात मारला डल्ला, सीसीटीव्ही फुटेजवरून चोरीचा उलगडा त. भा. प्रतिनिधी बेळगाव : रामदेव गल्ली सराफी दुकानातील चोरी प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. दुकान मालकालाच या प्रकरणी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याजवळून 65 लाख 95 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. कृष्णानंद…

Read More

सहा खासदारांच्या पक्षांतराला मान्यता

उद्धव ठाकरे यांना लोकसभा अध्यक्षांचा मोठा हादरा : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले या निर्णयाचे स्वागत वृत्तसंस्था/ नवी दिल्ली उबाठा शिवसेनेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या सहा लोकसभा खासदारांच्या पक्षांतराला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली आहे. संसदेचे वर्षाकालीन अधिवेशनाचा प्रारंभ येत्या सोमवारी होत आहे. त्याआधी हा निर्णय आला आहे. यामुळे उद्धव ठाकरे…

Read More

अर्जेंटिना की स्पेन ? आज निकाल

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा आज अंतिम सामना, स्पेनचा भर पारंपरिक पद्धतीवर, तर अर्जेंटिनाचा मेस्सीवर वृत्तसंस्था, न्यू जर्सी : या वर्षाच्या सुऊवातीला कतारमध्ये दक्षिण अमेरिका आणि युरोपच्या विजेत्यांमधील ‘फायनालिसीमा’मध्ये अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात हिशोब चुकता होणार होता. परंतु इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांमुळे तो सामना रद्द करावा लागला. अखेर ते आज रविवारी न्यू जर्सीमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार असून यावेळी…

Read More

Harsh Goenkas Cryptic Post Amid Rohit Sharma Retirement Buzz Goes Viral | ‘हा गंभीर विषय आहे’, हर्ष गोएंकांच्या ‘RoKo’ पोस्टमागचा अर्थ काय? रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांना लागलं नवं वळण

India vs England ODI: भारत-इंग्लंड वनडे मालिकेच्या निर्णायक सामन्यापूर्वी रोहित शर्मा निवृत्त होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर हर्ष गोएंका यांनी एक सूचक पोस्ट करत क्रिकेटविश्वात खळबळ उडवली. त्यांच्या या पोस्टवरून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्याबाबत विविध प्रकारचे अंदाज वर्तवले जात आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू…

Read More

सावंतवाडीत आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये महाकवी कालिदास दिन साजरा!

सावंतवाडी प्रतिनिधी : आयुर्वेद शिक्षणामध्ये संस्कृत भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे संस्कृत ही आयुर्वेद अध्ययनाची मूलभूत भाषा असून प्रत्येक आयुर्वेद विद्यार्थ्यासाठी तिचे ज्ञान आवश्यक आहे. असे प्रतिपादन सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या संस्कृत संहिता सिध्दांत विभागाचे प्रमुख डॉ. बी. पाटील यांनी केले.सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये जिज्ञासा संस्कृत क्लब एवं संस्कृत…

Read More