Headlines

lonavala chikki got Gi tag | लोणावळा चिक्कीला ‘जीआय टॅग’ जागतिक स्तरावर निर्माण होणार वेगळी ओळख

त. भा. प्रतिनिधी, लोणावळा 1880 साली म्हणजेच सुमारे 146 वर्षांपूर्वी मजुरांसाठी ’एनर्जी बार’ म्हणून सुरू झालेली गुडदाणी म्हणजेच आजची चिक्की ही जीआय टॅग (भौगोलिक संकेत) मिळवून जागतिक स्तरावर लोणावळ्याची अधिकृत ओळख बनली आहे. अठराव्या शतकाच्या अखेरीस लोणावळा खंडाळा परिसरात भोरघाटात अत्यंत प्रतिकुल नैसर्गिक परीस्थितीत इंग्रजांची ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीची रेल्वेलाईन टाकण्याचे काम कामे सुरू होती….

Read More

Mumbai News | अरबी समुद्रातील उच्च भरतीच्या लाटांचा ऑरेंज अलर्टमुळे मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन

मुंबई : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीसाठी उच्च भरतीचा (हाय टाईड ) 24 तासांचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने मच्छीमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. याशिवाय, स्थानिक मत्स्यव्यवसाय विभाग, किनारी प्रशासन आणि अधिकृत हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. अरबी समुद्रात कमी तीव्रतेचा भूकंपामुळे कोणताही…

Read More

CJP Protest |‘सीजेपी’चा संसदेवर मोर्चा मोठ्या संख्येने सहभागाचे अभिजीत दीपके यांचे आवाहन

► वृत्तसंस्था नवी दिल्लीकेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला 20 जुलै रोजी एक महिना पूर्ण होत असताना सोमवारी संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चापूर्वी, कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर येथून रुग्णालयात दाखल केले…

Read More

Abhishek Banerjee Controversy |अभिषेक बॅनर्जी यांना न्यायालयाचा तूर्त दिलासा, अमतला येथील पक्ष कार्यालयाच्या पाडकामाला स्थगिती

► वृत्तसंस्था कोलकातादक्षिण 24 परगणा जिह्यातील अमतला येथील तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातील कार्यालयाच्या पाडकामाला कोलकाता उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. न्यायालयाने रविवारी झालेल्या विशेष सुनावणीदरम्यान जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत इमारतीची ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले. विशेष सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती राजा बसू चौधरी यांनी राज्य सरकारला अमतला इमारतीशी…

Read More

Parliament Session 2026 संसदेत रंगणार ‘महासंग्राम’… पावसाळी अधिवेशन आजपासून, नीट पेपरफुटी, राम मंदिरातील देणगी अपहारावरून गदारोळ अपेक्षित

► वृत्तसंस्था नवी दिल्लीआज सोमवार, 20 जुलैपासून सुरू होणारे संसदेचे पावसाळी अधिवेशन बरेच गदारोळाचे होण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्ष दोन्ही सज्ज झाले आहेत. या अधिवेशनात एनडीए आयकर सुधारणा विधेयक, राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक आणि सर्वोच्च न्यायालय (न्यायाधीशांची संख्या) सुधारणा विधेयक यांसारखी सात प्रमुख विधेयके मंजूर करण्यावर लक्ष केंद्रित…

Read More

राम मंदिर देणगी अपहारप्रकरणी खर्गे, राहुल गांधींचे मोदींना पत्र पंतप्रधानांच्या मौनावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

► वृत्तसंस्था नवी दिल्लीसंसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्या आणि कथित आर्थिक अनियमिततेचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक संयुक्त पत्र लिहून राम मंदिराच्या देणग्यांमधील कथित अनियमिततेवर त्यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह…

Read More

Nagaland Landslide | नागालँडमध्ये भूस्खलन ४ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

नागालँडच्या मोन जिल्ह्यातील डिफेन्स कॉलनीत रविवारी झालेल्या भीषण भूस्खलनात किमान चार जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली आणखी बरेच जण अडकल्याची भीती आहे. भूस्खलनामुळे अनेक घरे वाहून गेली आणि एक मोठी बचाव मोहीम सुरू करण्यात आली. एका बचाव अधिकाऱ्याने सांगितले की, भूस्खलनामुळे वसाहतीमधील सुमारे १५ घरांना मोठा फटका बसला आहे . बचाव पथकांचे काम आसाम रायफल्सचे जवान,…

Read More

Shekhar Suman on Sonam Wangchuk

“सर्व जिवंत प्रेतांमध्ये तो एकटाच जिवंत होता” अशी सोनम वांगचुक यांच्याबद्दल अभिनेते शेखर सुमन यांनी आपल्या शेखर टुनाईट या शोमध्ये म्हटले. तसेच त्यांनी केंद्र सरकारवरही या मुद्द्यावरुन टीका केली आहे. दिल्लीतील जंतरमंतर येथे अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात नेल्यानंतर कित्येकांनी संतप्त आणि भावूक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातून…

Read More

Sonam Wangchuk hunger strike | वांगचुकना तातडीने सरकारी रुग्णालयातून हलवण्याची पत्नीची याचिका फेटाळली

नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषणास बसलेल्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर देशभरात गदारोळ निर्माण झाला. त्यानंतर सरकारी रुग्णालयात दाखल केलेल्या वांगचुक यांना हलवण्यात यावे अशी याचिका त्यांची पत्नी गीतांजली जे आंगमो यांनी केली होती. या याचिकेला फेटाळत सोनम वांगचुक यांना सध्या सरकारी रुग्णालयातून हलवण्याची गरज नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने रविवारी सांगितले….

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन संस्थांना मार्गदर्शनासह सर्वतोपरी सहकार्य!

ओटवणे प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला नवी गती देण्यासाठी आणि स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या विविध समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. नवीन पर्यटन धोरण आणि योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी भविष्यात विशेष पर्यटन कार्यशाळा आयोजित करून पर्यटन संस्थांना मार्गदर्शन केले जाईल. तसेच पर्यटन संस्थांच्या परिपूर्ण प्रस्तावांना तात्काळ मंजुरी दिली जाईल. अशी ग्वाही…

Read More