Headlines

वांगचूक यांना पाठिंब्यासाठी आज पणजीत उपोषण


प्रतिनिधी/ पणजी

शिक्षण तसेच पर्यावरण क्षेत्रात महान कार्य केलेले व सध्या नीट पेपर फुटीप्रकरणी दिल्लीत उपोषण करत असलले सोनम वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी आज रविवार दि. 19 रोजी पणजीत आझाद मैदानावर सामाजिक कार्यकर्त्यांकडून लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. वांगचूक यांनीच दिलेल्या हाकेला प्रतिसाद म्हणून हे आंदोलन करण्यात येणार असून प्रसिद्ध नाट्याकर्मी तथा सामाजिक कार्यकर्ते राजदीप नाईक त्याचे नेतृत्व करणार आहेत. त्यावेळी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व नागरिकही सहभाग घेणार आहेत.

शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी यासाठी वांगचूक यांनी महान कार्य केले आहे. त्याचबरोबर पर्यावरण क्षेत्रातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सध्या ते नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ते दिल्लीत आंदोलन करत आहेत. या त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज गोव्यात लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. नाईक यांनी दिली.

सकाळी 9.30 वाजता उपोषण प्रारंभ होणार असून ते संध्याकाळपर्यंत चालणार आहे. त्यावेळी विविध सामाजिक कार्यकर्ते आणि समविचारी नागरिक सहभागी होणार आहेत. शिक्षण, पर्यावरण आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी नागरिकांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन नाईक यांनी केले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत