पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:हरल्यावर काय करावे, हेही जे शिकवते ते खरे नेतृत्व
पूर्वी शिकण्याचे आणि शिकवण्याचे मार्ग वेगळे होते. आंघोळ करताना पाणी उडवणे, उशा मारणे, चादरी पांघरून एकमेकांना घाबरवणे या खेळांमागे एक मानसशास्त्र होते. कसे वार करावे, स्वतःचा बचाव कसा करावा आणि नेतृत्व कसे करावे, यात आपलेपणा होता. खेळता-खेळता आपण खूप काही शिकलो. आता तर शिकण्यालाही एक खेळ बनवले जात आहे, कारण यंत्रांचा प्रभाव वाढत आहे. हल्ली…
