- Marathi News
- Opinion
- Pandit Vijay Shankar Mehta Column: Strengthening Emotional Bond Between Nature & Humans
6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

झाडांनाही काही सांगायचे असते. हे निसर्गाच्या समर्थनार्थ बोललेले केवळ आदर्श वाक्य नाही, तर त्यामागे वैज्ञानिक सत्य आहे. 20 ते 100 किलोहर्ट्झ या वारंवार ते वर झाडे व वनस्पती ध्वनी निर्माण करतात. इतर झाडे व काही प्राणी हे ध्वनी ऐकूही शकतात. यासंदर्भात वैज्ञानिक प्रयोगही झाले. शांत वातावरणात झाडे जणू काही गुणगुणत असतात.त्यांची फुले तोडली म्हणून ती दुखावतात, असे नाही.
मात्र हळूहळू माणसाने वनस्पतींचा आवाज समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. ते शक्यही होऊ शकते. निसर्ग व माणूस यांच्यातील भावनिक नातेअधिक दृढ व्हावे . अन्यथा माणसा माणसांतील भावनिक नातेसंबंधही कमकुवत होतील. पूर्वी जघन्य गुन्ह्यांची नोंद प्रामुख्याने पुरुषांच्या नावावर होत असे. आता काही महिला व तरुणीही मर्यादा ओलांडताना दिसतात. गुन्हा घडला तर कायदा आपले काम करतो. मात्र यामुळे एकमोठे नुकसान झाले आहे. कुटुंबांतील परस्पर विश्वास,नातेसंबंधांवर संशयाची छाया निर्माण झाली.आपण निसर्गापासून दूर जाऊ, तितके अधिक हिंसक, आक्रमक व नकारात्मक होत जाऊ.
