![]()
आपली दोन घर असतात – एक लहान आणि एक मोठे. लहान घर म्हणजे चार भिंतींचे आपले निवासस्थान. त्यातसोफा असतो. जेवणाचे टेबल, बिछाना असतो. या घराचीआपण विशेष काळजी घेतो. ते स्वच्छ ठेवतो, जपतो;कारण ते आपल्याला सुरक्षितता देते. धूळ, उष्णता, थंडी,वारा व पावसापासून संरक्षण करते. याचप्रमाणे आपले आणखी एक मोठे घर आहे – पृथ्वीचेपर्यावरण. हेही आपले संरक्षण करते. हे मोठे घर नसते तरसूर्याची किरणे इतकी तीव्र असती की ती सहन करणेअशक्य झाले असते. किंवा पृथ्वीचे तापमान इतके कमीझाले असते की येथे जीवनच शक्य राहिले नसते. मगअसे असतानाही आपण या मोठ्या घराची काळजी काघेत नाही? पर्यावरणात अतिउष्णता, अतिथंडी किंवाअतिवृष्टी झाली, तर त्याचा परिणाम थेट आपल्यावरहोतो. एकूणच पर्यावरणात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचापरिणाम आपल्या जीवनावर होतो. पण आपण काहीकरतो, त्याचाही परिणाम पर्यावरणावर होतो. प्रत्यक्षात आधुनिक जीवनात पर्यावरणावर परिणाम होत नाही असेमाणसाचे फार कमी काम असेल. दुर्दैवाने आपल्याबहुतांश कृती पर्यावरणाला सकारात्मक नव्हे, तरनकारात्मक पद्धतीने प्रभावित करतात. हे पर्यावरण,म्हणजेच आपले हे मोठे घर, आपल्याला जीवन देते. तेचआपल्याला हवा, पाणी, अन्न वजगण्यालायक परिस्थितीउपलब्ध करून देते. पण त्याच्या बदल्यात आपण त्यालाकाय देतो? आपण ते प्रदूषित करतो. त्यात कार्बनडायऑक्साइड आणि इतर प्रदूषक सोडतो. आपणस्वयंपाक करतो, प्रवास करतो, वीज वापरतो किंवाएखादी वस्तू खरेदी करतो, तेव्हा प्रत्येक वेळी कार्बनडायऑक्साइडच्या रूपातील अदृश्य कचरा वातावरणातसोडतो. हाच कचरा पृथ्वीचे तापमान वाढवण्याचे कामकरतो. आपल्याला वाटते की हवामान बदल किंवा प्रदूषणकेवळ कारखान्यांमुळे होते. तसे नाही. आपल्या दैनंदिनजीवनातील आणि कारखान्यांत तयार होणाऱ्या वस्तूंच्याअनियंत्रित वापरामुळेही ते मोठ्या प्रमाणात वाढते. आपणसर्वजण दररोज, किंबहुना प्रत्येक मिनिटाला, हा अदृश्यकचरा फेकून आपल्या वातावरणरूपी मोठ्या घराचेनुकसान करत आहोत. एकदा माझ्या व्याख्यानात मीश्रोत्यांना म्हणालो, //”मी तुम्हा प्रत्येकाला थोडासा कचरादेतो. तो तुम्ही घरी नेऊन स्वतःच्या घरात टाकाल का? ‘सर्वांनी तात्काळ नकार दिला. कुणी म्हणाले, //”बायकोरागावेल.//” कुणी म्हणाले, //”आई ओरडेल.’ तेव्हा मीविचारले, //” आपण आपल्या छोट्या घरातही कचराटाकत नाही, तेव्हा आपल्याला जीवन देणाऱ्या या मोठ्याघरात कचरा कसा टाकतो?//” आज देश-विदेशात अवेळीपाऊस पडत आहे. थंड युरोपात जीवघेणी उष्णतेची लाटआली आहे. जंगलांना आग लागत आहे. हवामानातील हाअसमतोल म्हणजे निसर्गाची प्रतिक्रिया आहे. काहीतरीगंभीर बिघडत असल्याचा तो निसर्गाचा इशारा आहे. कधीकधी मला वाटते, आपणच निसर्ग असतो, तर कदाचितअशीच शिक्षा दिली असती. कारण आपण त्याच्या घरातकचरा पसरवत आहोत. त्याचे संतुलन बिघडवत आहोतआणि तरीही सर्व काही पूर्ववत राहावे, अशी अपेक्षा करतआहोत. आज आपण पृथ्वीवर कचरा टाकत आहोत,त्याची शिक्षा पुढील पिढ्यांना भोगावी लागणार आहे. हेकटू सत्य आपल्याला जागे करण्यासाठी पुरेसे आहे.कदाचित याच जाणिवेतून पर्यावरण संवर्धनाची खरीसुरुवात होईल आणि मर्यादित संसाधने असलेल्या यापृथ्वीवर आपल्या गरजाही मर्यादित ठेवण्याचा आपणप्रयत्न करू. हवामान सुधारणा केवळ तंत्रज्ञानाने किंवा कायद्यांनी सुरूहोत नाही. ती जागरूकतेतून सुरू होते. ती संयमातून सुरूहोते. आणि आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या या मोठ्याघराशी तितक्याच आदराने वागण्यापासून सुरू होते,जितक्या आदराने आपण आपल्या शयनकक्षाची काळजीघेतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. )
Source link
प्रा. चेतनसिंह सोळंकी यांचा कॉलम:आपली पृथ्वी हेच आपले मोठे घर; स्वतःच्या घराप्रमाणे ते स्वच्छ ठेवावे
