Headlines

Ayodhya Ram Mandir Donation Theft; Navneet Gujar Column on Citys Painful Past


  • Marathi News
  • Opinion
  • Ayodhya Ram Mandir Donation Theft; Navneet Gujar Column On Citys Painful Past

4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‎‎‎‎‎‎‎‎‎‎सध्या देशभरात चर्चा आहे ती अयोध्येतील श्रीराम‎मंदिराची आणि मंदिराच्या दानपेटीतील कथित चोरीची.‎काही जण म्हणतात, मोठ्या लोकांना वाचवले जात‎आहे व लहान कर्मचाऱ्यांवर कारवाई होत आहे. तर‎सरकारचे म्हणणे आहे की, दोषी कुणीही असो, त्याला‎शिक्षा टाळता येणार नाही.‎

रामधनाची चोरी केव्हापासून सुरू होती व किती रक्कम‎लंपास झाली, हे अद्याप स्पष्ट नाही. तपासादरम्यान‎काहींच्या घरातून सोने-चांदी जप्त झाल्याचे सांगितले‎जाते. काहींकडून मंदिराच्या दानपेट्याच जप्त केल्याचे ‎‎समोर आले आहे. या तपासातून अखेर काय निष्पन्न‎होईल, हे अद्याप सांगता येत नाही. या प्रकरणात कोण ‎‎कुणाला वाचवत आहे किंवा कुणाला गोवण्याचा प्रयत्न‎होत आहे, याचा अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. ‎‎मात्र तपास करणाऱ्या विशेष तपास पथकावर ‎‎(एसआयटी) कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा ‎‎प्रशासकीय दबाव येऊ नये, ही राज्य सरकारची‎जबाबदारी आहे. शक्य असल्यास न्यायालयाच्या ‎‎देखरेखीखाली तपास व्हावा. तसेच मंदिरातील देणगीचे‎निष्पक्ष व स्वतंत्र ऑडिट झाल्याशिवाय चोरीची खरी‎रक्कम समोर येणे कठीण आहे. या घटनेमुळे‎अयोध्येच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्वालाही‎धक्का बसला आहे. अयोध्येचा पहिला उल्लेख‎अथर्ववेदात आढळतो. त्यामध्ये अयोध्येचे वर्णन‎देवतांची नगरी म्हणून केले गेले – “अष्टचक्रा नवद्वारा‎देवानां पुरयोध्या.” ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मनू यांनी भगवान‎विष्णूंच्या सल्ल्याने व विश्वकर्म्यांच्या देखरेखीखाली या‎नगरीची स्थापना केली होती. स्कंदपुराणानुसार अयोध्या‎भगवान विष्णूंच्या सुदर्शन चक्रावर वसलेली आहे.‎त्याशिवाय वैवस्वत मनू यांनी ही नगरी प्रथम‎वसवल्याचेही मानले जाते. अयोध्येसाठी अशा घटना‎नवीन नाहीत. या देवनगरीने वैभव, पराक्रम आणि त्याग‎पाहिला. डोंगराएवढी दुःखेही अनुभवली. ऋषितुल्य‎राजा मांधाता यांचे साम्राज्य पाहिले, तर सत्यासाठी‎सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या राजा हरिश्चंद्रांचे जीवनही‎अनुभवले. कैकेयीने युद्धात तुटलेल्या रथाच्या चाकात‎स्वतःचे बोट अडकवून केलेला त्याग पाहिला तर त्याच‎कैकेयीच्या हट्टामुळे प्रभू श्रीरामांना वनवासाला‎जातानाही पाहिले. अयोध्येची तुलना स्वर्गाशी केली‎गेली, पण तिच्या वेदनांनाही अंत नव्हता. पुत्रवियोगाने‎राजा दशरथांनी प्राणत्याग केला. भरताने सिंहासन‎नाकारून श्रीरामांच्या पादुकांची पूजा केली. लक्ष्मणाने‎चौदा वर्षे अखंड सेवा केली, तर ऊर्मिलेने विरह सहन‎केला. त्रेतायुगापासून कलियुगापर्यंतच्या असंख्य कथा‎या नगरीच्या इतिहासात कोरल्या गेल्या.‎

आज श्रीराम मंदिरात भाविकांना रामलल्लाचे दर्शन घेता‎येते. त्या जन्मभूमीसाठी साडेचारशे वर्षांहून अधिक‎काळ संघर्ष झाला. कधी संत, धर्मगुरूंनी या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आंदोलनाचे नेतृत्व केले. कधी राजकीय पक्ष त्यात‎सहभागी झाले. आंदोलनामुळे अनेक सरकारे‎कोसळली.काही सत्तेत आली. या आंदोलनाला मोठी‎गती मिळाली ती बाबरी मशिदीचे कुलूप उघडल्यानंतर.‎शाहबानो प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय केंद्राने‎मुस्लिम समाजाच्या दबावाखाली बदलल्यानंतर हिंदू‎समाजात नाराजी निर्माण झाली. त्यानंतर 1 फेब्रुवारी‎1986 रोजी बाबरीचे कुलूप उघडले. त्या बंद‎दरवाजांमागे संघर्ष दडलेला आहे, याची कुणालाही‎कल्पना नव्हती. अशोक सिंघल यांच्या शिलापूजनामुळे‎हे आंदोलन घरोघर पोहोचले. आज अशोक सिंघल‎हयात असते, तर त्यांना काय वाटले असते? त्यांनी‎आयुष्य मंदिरासाठी संघर्षात घालवले आणि अखेर “‎श्रीराम मंदिर उभे राहताना पाहणे हीच अखेरची इच्छा‎आहे,” असे म्हणत या जगाचा निरोप घेतला.‎

अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी शेकडो‎नव्हे, तर हजारो लोकांनी अनेक वर्षे संघर्ष‎केला. अनेकांनी प्राणांचीही आहुती दिली.‎अशा मंदिरात देणगीच्या रकमेतील कथित‎चोरीच्या घटनांमुळे त्यांच्या आत्म्याला‎किती वेदना झाल्या असतील, याची‎कल्पनाही करणे कठीण आहे.‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत