Headlines

Naresh Mhaske Accuses Sanjay Raut Of Secret CM Aspirations


शिवसेनेचे नेते आणि खासदार नरेश म्हस्के यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. “संजय राऊत हे ‘फेकूचंद’ असून, राज्यसभेचे तिकीट उशिरा दिल्याने त्यांनीच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाक

.

“स्वतःचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेण्यासाठी कट रचला”

संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना म्हस्के म्हणाले, “संजय राऊतांनी आतापर्यंत अनेक खोटे गौप्यस्फोट केले आहेत. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले पण त्यांच्या भावाला मंत्रिपद दिले नाही, तेव्हा राऊत किती नाराज होते हे सर्वांना माहीत आहे. जेव्हा उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नव्हते, तेव्हा शिवसेनेच्या आमदारांची पवईच्या हॉटेलमध्ये मिटिंग घेऊन ठाकरेंना विरोध करा आणि ‘माझे नाव मुख्यमंत्रीपदासाठी घ्या’, असा कट कोण रचत होते? हे अख्ख्या शिवसेनेला माहीत आहे.”

“राज्यसभेचे तिकीट उशिरा दिल्याने ठाकरेंना शिव्या घातल्या”

म्हस्के यांनी यावेळी राऊतांच्या निष्ठेवरच प्रश्नचिन्ह उभे केले. ते म्हणाले, “ज्यावेळी राज्यसभेचे तिकीट पुन्हा एकदा लवकर डिक्लेअर केले जात नव्हते, त्यावेळी उद्धव ठाकरे सोडा, रश्मी वहिनींच्या संदर्भात संजय राऊत किती शिव्या घालत होते, हे पूर्ण शिवसेनेला माहिती आहे. भोंगा वगैरे शब्दांची निर्मिती मीच केल्याने राऊतांचा माझ्यावर राग आहे, हे मी समजू शकतो.”

“एक जरी पत्र दाखवले, तर मी राजीनामा देईन!”

संजय राऊत यांना खुले आव्हान देताना नरेश म्हस्के म्हणाले, “तुम्ही जर खरोखरच बाळासाहेबांना मानत असाल, तर मी लिहिलेले एक जरी पत्र दाखवून द्या. जर असे पत्र असेल तर मी राजीनामा देईन, नाहीतर तुम्ही तरी राजीनामा द्या. तुम्ही मला रोज सकाळ-संध्याकाळ फोन करून काय बोलत होतात, ते तुम्हीच जाहीर करा. तुम्ही काय बोलत होतात, हे मला जगासमोर जाहीर करायला लावू नका.”

“मी कायम एकनाथ शिंदेंसोबतच राहणार”

आपली भूमिका स्पष्ट करताना म्हस्के यांनी ठणकावून सांगितले की, “एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणारा मी महाराष्ट्रातील पहिला जिल्हाप्रमुख आहे. नरेश म्हस्केवर कितीही टीका करा, मी एकनाथ शिंदे यांच्यासोबतच आहे आणि कायम त्यांच्यासोबतच राहणार, हे सर्वांनी लक्षात ठेवावे.”

नरेश म्हस्के यांच्या या आक्रमक पत्रकार परिषदेमुळे आणि त्यांनी केलेल्या थेट वैयक्तिक आरोपांमुळे आता शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे.

हेही वाचा..

निवडणूक आयोगाने चोरांच्या हातात पक्षचिन्ह दिले!:शिवसेना सुनावणी आणि संसदेतील मोदी-शहांच्या अनुपस्थितीवरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य आणि केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप करत सडकून टीका केली. राज्यातील आदिवासी भागात होणारा भ्रष्टाचार, आश्रमशाळेत सर्पदंशाने झालेले मृत्यू, खाण माफियांचा सुळसुळाट आणि शिवसेना पक्षचिन्हाची सुनावणी या सर्वच मुद्द्यांवरून राऊत यांनी सरकारचे वाभाडे काढले. सविस्तर वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत