Maharashtra Rain: दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधून मधून हलक्या सरी असेच चित्र सगळीकडे सध्या अनुभवायला मिळते आहे. मराठवाड्यामध्ये सरासरी तापमानापेक्षा जास्त तापमानाची नोंद होते आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात १ ते २६ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात १८१ तर शहरात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत २३ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे. पावसाचा जोर वाढण्यास अपेक्षित असलेले वातावरणच गेल्या महिनाभरात तयार झाले नाही. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता, इतरत्र पाऊस पडला नाही.
Sunetra Pawar: कंपन्यांच्या वेळेत बदल करा; वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनादरम्यान, पुण्यात जुलैमध्ये सरासरीच्या दुप्पट पाऊस पडला होता. पण ऑगस्टच्या पहिल्या दिवसापासून पावसाचा जोर ओसरला आहे. दिवसभरात सरासरी तीन ते चार मिलिमीटर पावसाची नोंद होते आहे. जिल्हा आणि घाट माथ्यावरही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी सध्या बरसत आहेत. त्यामुळे एकूण जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत पावसाची तूट वाढली आहे. पुढील चार दिवसात शहरात लक्षणीय बदल होण्याची शक्यता नाही, असे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत पडलेला पाऊस
- १ जून ते २६ ऑगस्ट : ६६५ मिमी
- १ ते ३० जून : ६४ मिमी
- १ ते ३१ जुलै : ५२५ मिमी
- १ ते २६ ऑगस्ट : ७६ मिमी
Pune News : पुण्यातलं चक्रावणारं प्रकरण, जेलमध्ये भेटले अन् कट आखला, सायबर क्राईमचं जाळं विणलंसरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडलेले जिल्हे (टक्क्यांमध्ये)
- अकोला (-८५)
- बीड (-८५)
- वर्धा (-८४)
- अमरावती (-८६)
- यवतमाळ (-७९)
- सोलापूर (-७७)
- नागपूर (-७४)
- अहिल्यानगर (-७४)
- धाराशिव (-७३)
- हिंगोली (-७१)
- वाशीम (-६८)
- परभणी (- ६७)
- चंद्रपूर (-६४)
- नांदेड (-६०)
ऑगस्ट महिन्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडलेले जिल्हे (टक्क्यांमध्ये)
- सातारा (१९)
नाशिक (३)
सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेले जिल्हे – (टक्क्यांमध्ये)
- बुलढाणा (- ५९)
- लातूर (-५२)
- छत्रपती संभाजीनगर (-४६)
- पालघर (४३)
- मुंबई (-३५)
- ठाणे (-३२)
- सांगली (-३२)
- रायगड (-३०)
- रत्नागिरी (-२५)
- गोंदिया (-२५)
- सिंधुदुर्ग (-२४)
- पुणे (-२३)

