Headlines

Joint Home Loan Property Ownership Rules; सह-कर्जदाराचा मृत्यू झाला, कर्ज फिटले तरी मालकी हक्क आपोआप मिळणार नाही; संयुक्त गृहकर्जाचे नियम समजून घ्या


Property Rules: गृहकर्जामुळे आजच्या काळात मोठ-मोठ्या शहरांमध्ये स्वप्नातलं घर खरेदी करणे सोपे झाले आहे. यामध्येही बहुतेक लोक संयुक्त गृहकर्ज म्हणजे जॉईंट होम लोन घेतात, जेणेकरून कर्जाच्या हप्त्याची परतफेड करण्याची जबाबदारी एकाच व्यक्तीवर न पडता दोन व्यक्तीसोबत पार पडतात. Joint Home Loan मध्ये कर्जाची रक्कम जास्त असते आणि हप्ता दोघांमध्ये विभागला जाऊ शकतो.

पण यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की संयुक्त गृहकर्ज घेतलेल्यांपैकी एकाचा मृत्यू झाल्यास काय होतं? कर्जाची जबाबदारी फक्त एकाच सदस्यावर पडते का? इतकेच नाही तर घराची मालकी फक्त एकाच सदस्याकडे हस्तांतरित होईल का? उदाहणार्थ पती-पत्नी किंवा कुटुंबातील दोन सदस्यांनी मिळून गृहकर्ज घेतले आणि त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर कुटुंबासमोर सर्वात मोठा प्रश्न असतो की उर्वरित कर्जाची परतफेड करणार कोण आणि घरावरील हक्क कोणाचा असेल? याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

Maharashtra TimesHighest Paying Job: इंटर्न्सना 30-50 लाखांचा पगार, खास स्किलमुळे फ्रेशर्सना मिळतेय बंपर पगाराची ऑफर; पाहा गलेलठ्ठ पगार देणाऱ्या या कंपन्या कोणत्या?

संयुक्त गृहकर्जामध्ये एकाचा मृत्यू झाल्यास काय?

संयुक्त गृहकर्ज घेतलेल्यांपैकी एका मृत्यू झाल्यास थकीत कर्ज निम्मे होते किंवा कर्जातील मृताचा वाटा पूर्णपणे संपुष्टात येतो, असा बहुतेकांचा समाज असतो. पण, वास्तव या उलट आहे. अशाप्रकारच्या कर्जामध्ये कर्ज आणि घराची मालकी स्वतंत्र हाताळली जाते. लोन अग्रीमेंट, मालमत्तेची कागदपत्रे, मृत्युपत्र, वारसा हक्काची कागदपत्रे आणि कर्जासोबत घेतलेली विमा पॉलिसी यांवरून भविष्यातील कारवाई निश्चित केली जाते.

बहुतेक संयुक्त गृहकर्जांमध्ये दोन्ही कर्जदार बँकेप्रती संयुक्त आणि स्वतंत्र जबाबदारी घेतात. अशा परिस्थितीत, एका सह-कर्जदाराचा मृत्यू झाल्यास उर्वरित कर्जदारांवर सामान्यतः थकीत कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी पडते. कर्ज घेताना ईएमआयचा कोणता भाग कोण भरतं, याने सहसा काही फरक पडत नाही. बँकेचा मुख्य उद्देश थकीत रक्कम वसूल करण्याचा असतो आणि दोन्ही कर्जदारांच्या जबाबदाऱ्या कर्ज करारामध्ये पूर्वनिश्चित केलेल्या असतात.

Maharashtra TimesGold Silver Duty Cut: सरकार सोनं चांदी स्वस्त करणार? एका निर्णयामुळे झटक्यात दर कमी होणार; सणासुदीला खरेदीची सुवर्ण संधी मिळणार

घराचा मालक कोण? हा वेगळा प्रश्न

याशिवाय संयुक्त गृहकर्जाच्या प्रकरणांमध्ये एका सदस्याच्या मृत्यूनंतर दुसऱ्या सदस्याला घराची संपूर्ण मालकी मिळत नाही. कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी आणि घराची मालकी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. घराची मालकी कर्जाच्या परतफेडीवर नाही तर, मालमत्तेचे हक्क आणि कायदेशीर वारसा हक्कानुसार ठरवले जाते. अशा परिस्थितीत, मृत व्यक्तीचा घरात वाटा असल्यास तो त्याच्या कायदेशीर वारसांना, ज्यामध्ये त्याचे पती/पत्नी, मुले किंवा इतर कायदेशीर वारसांचा समावेश असेल. याशिवाय, मृत व्यक्तीने मृत्युपत्र केले असेल, तर त्या मृत्युपत्रानुसार मालमत्तेचा वाटा-हिस्सा केला जाईल.

संयुक्त गृहकर्जाच्या प्रकरणातील वाद

याच कारणामुळे संयुक्त गृहकर्जांच्या प्रकारणांमधील कुटुंबात सदस्याच्या मृत्यूनंतर अनेकदा वाद होतात. ही स्थिती टाळण्यासाठी लोकांनी संयुक्त गृहकर्ज घेण्यापूर्वी सर्व अटी निश्चित केल्या पाहिजे.

Maharashtra TimesUS Sanctions on Iran Explained: अमेरिकेचा इराणशी वैर अन् धग भारताला, भारताच्या तांदूळ, चहा, औषध निर्यातीला धोका; ट्रम्प यांनी खेळला आर्थिक नाकेबंदीचा डावयाअंतर्गत सर्वप्रथम घरातील प्रत्येक व्यक्तीचा वाटा आणि मृत्यूनंतर त्या वाट्याचे काय होईल? याबाबत महत्वाच्या बाबी निश्चित केल्या पाहिजे. भविष्यात मालमत्तेवरून होणारे कौटुंबिक वाद कमी करण्यासाठी मृत्युपत्र तयार करणे देखील फायदेशीर ठरू शकते. संयुक्त गृहकर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर थकीत कर्ज संपुष्टात येत नाही, असे तज्ज्ञ म्हणतात. तर कर्जाचा ईएमआय भरण्याची जबाबदारी आणि घराची मालकी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

याशिवाय गृहकर्जासोबत लोन प्रोटेक्शन इन्श्युरन्सही घेणे चांगला पर्याय असू शकतो. अशी पॉलिसी काही विशिष्ट परिस्थितीत, कर्जदाराच्या मृत्यूनंतर थकीत कर्ज फेडण्यास मदत करू शकते, ज्यामुळे संपूर्ण आर्थिक भार दुसऱ्या व्यक्तीवर पडणे टाळते.

लक्षात घ्या की संयुक्त गृहकर्जामध्ये दोन्ही कर्जदार सामान्यतः संयुक्त आणि स्वतंत्र जबाबदार असतात. म्हणजे आवश्यक असल्यास बँक दोन्हीपैकी कोणत्याही कर्जदाराकडून कर्जाची संपूर्ण थकबाकी वसूल करू शकते.