पुण्यात सायबर गुन्हेगारीचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी जेलमध्ये सायबर गुन्हेगारीचा कट आखला. जेलमधील ओळखीतून सायबर गुन्ह्यांचे जाळे तयार केले. आरोपींनी ८ बँक खाती उघडून फसवणूक केली. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड : सायबर गुन्ह्यात तब्बल दीड वर्षे न्यायालयीन कोठडीत राहिलेल्या आरोपीसोबत येरवडा कारागृहात झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी आतापर्यंत तब्बल आठ बँक खाती उघडून ती सायबर गुन्ह्यांसाठी वापरल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणातील फिर्यादी हे ज्येष्ठ नागरिक आहेत. शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची तब्बल 86 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणुकीचे पैसे विविध बँक खात्यांमध्ये फसवलं
गुन्ह्याच्या तपासादरम्यान फसवणुकीची रक्कम विविध बँक खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यापैकी 14 जुलै 2026 रोजी पाच लाख रुपये इंडसइंड बँकेतील एका खात्यात जमा झाल्याचे आढळून आले. हे खाते तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय 24, रा. मरकळ, पुणे) याच्या नावावर असल्याचे समोर आले.
पोलिसांनी आरोपींना कसे शोधले?
पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तेजस लोखंडे याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने धक्कादायक माहिती दिली. हिंजवडी पोलीस ठाण्यातील अपहरण आणि खंडणीच्या गुन्ह्यात तो न्यायालयीन कोठडीत असताना त्याची येरवडा कारागृहात अविनाश ज्ञानोबा बाकलीकर याच्याशी ओळख झाली होती.
आरोपीने कारागृहात असतानाच सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती मिळविण्याचे नियोजन केल्याची माहिती तपासात समोर आली. जामिनावर बाहेर आल्यानंतर अविनाश बाकलीकर याच्या सांगण्यावरून तेजसने बँक खाते उघडून ते त्याच्याकडे दिल्याचे पोलिसांना सांगितले.
अविनाश बाकलीकर कोण?
अविनाश बाकलीकर हा यापूर्वी सायबर पोलीस ठाण्यातील गुन्हात अटक झालेला असून, त्या गुन्ह्यात तो सुमारे दीड वर्षे न्यायालयीन कोठडीत होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा सायबर गुन्ह्यांसाठी साथीदारांचे जाळे उभे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला लातूर येथून ताब्यात घेतले.
जेलमधून सुटल्यावर पुन्हा गुन्हेगारी कृत्य
चौकशीदरम्यान अविनाशने येरवडा कारागृहात इतर आरोपींशी संपर्क वाढविल्याचे समोर आले. त्यांचे मोबाईल क्रमांक वेगळ्या नावाने सेव्ह करून ठेवले होते. जामिनावर सुटल्यानंतर विविध आरोपींच्या संपर्कात राहून एकत्रितपणे सायबर गुन्हे केल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे.
आरोपींनी आठ खाती वापरली
पोलिसांच्या तपासानुसार, आरोपींनी आतापर्यंत आठ वेगवेगळी बँक खाती उघडून किंवा मिळवून, ती इतर साथीदारांच्या मदतीने सायबर गुन्ह्यांसाठी वापरली आहेत. याशिवाय आणखी करंट अकाऊंट उघडण्यासाठी कार्यालय सुरू केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या माध्यमातून भविष्यात आणखी सायबर गुन्हे करण्याची तयारी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विशेष म्हणजे, अविनाश बाकलीकर हा वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षात शिकत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. तो परदेशातील काही साथीदारांच्या संपर्कात राहून सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचाही पोलिसांना संशय आहे.
या प्रकरणात तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय २४, रा. मरकळ, पुणे) आणि अविनाश ज्ञानोबा बाकलीकर (वय २८, रा. लातूर) यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड करीत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे आणि पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, सहायक पोलीस निरीक्षक वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे तसेच पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई केली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा