Headlines

जुनी सांगवीत भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; कडेवरील एक वर्षाचे बाळ खाली पडून जखमी


पुण्यातील सांगवीत एका महिलेवर कुत्र्याने हल्ला केला. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कुत्र्याने हल्ला केला त्यावेळी महिलेच्या हातात एक वर्षाचे बाळ होते. हे बाळ हल्ल्यावेळी महिलेच्या हातून खाली पडले. यामुळे एक वर्षाचे बाळ जखमी झाले आहे.

Pune News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पुणे : जुनी सांगवी परिसरात भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मधुबन सोसायटी, लेन क्रमांक ४ येथील के. जी. डॉल्फिन स्कूल परिसरात बुधवारी सकाळी सुमारे ११.०४ वाजता एका भटक्या कुत्र्याने कडेवर एक वर्षाचे बाळ घेतलेल्या महिलेवर अचानक हल्ला केला. कुत्र्याने महिलेच्या पायाला चावा घेतल्याने ती जखमी झाली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या महिलेच्या कडेवरील बाळ खाली पडले आणि तेही जखमी झाले. या घटनेचा थरारक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला आपल्या एक वर्षाच्या बाळाला कडेवर घेऊन परिसरातून जात असताना भटक्या कुत्र्याने अचानक तिच्यावर झडप घातली. महिलेवर कुत्र्याने हल्ला करताच तिने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र या झटापटीत तिच्या हातातील बाळ खाली पडले. त्यामुळे आईला कुत्र्याच्या हल्ल्याचा सामना करावा लागतानाच अवघ्या एक वर्षाच्या बाळालाही दुखापत झाली.

परिसरातील नागरिकांमध्ये संताप

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, जुनी सांगवी परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न नवीन नाही. यापूर्वीही या भागात महिलांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये जुनी सांगवी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागला होता.

आठ महिन्यात 20 हजार नागरिकांना कुत्र्यांनी घेतला चावा

दरम्यान, पिंपरी- चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचे गांभीर्य यापूर्वीही समोर आले आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये महापालिकेच्या सभागृहात मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरून मोठा गदारोळ झाला होता. आठ महिन्यांत तब्बल २० हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्यात आला होता.

इतकेच नव्हे, तर ऑगस्ट २०२६ मध्ये चिखली परिसरात सात भटक्या कुत्र्यांनी चार वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली होती.

त्यामुळे जुनी सांगवीतील ताज्या घटनेने पुन्हा एकदा महापालिकेच्या भटक्या कुत्र्यांवरील नियंत्रणाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील मोकाट कुत्र्यांबाबत यापूर्वीही प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र समस्या कायम असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

नागरिकांचा प्रशासनाला सवाल

शाळा, सोसायट्या आणि रहिवासी परिसराच्या आसपास भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज एका महिलेवर हल्ला झाला आणि तिच्या कडेवरील एक वर्षाचे बाळ खाली पडून जखमी झाले. उद्या एखाद्या चिमुकल्यावर किंवा ज्येष्ठ नागरिकावर आणखी गंभीर हल्ला झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar : महापौरांनी खडसावलं अन् आक्रमक नगरसेवक शांत, पालिकेची सभा पाहण्यासाठी आलेले विद्यार्थी झाले अवाकमहापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, निर्बीजकरण आणि आवश्यक ती उपाययोजना तातडीने करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता प्रशासन कारवाई करणार की आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार? हा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा