Headlines

Amalner Takarkheda Bodies of Mother Father and Two Children Found on Railway Track; पहाटे लेकरांसह घराबाहेर पडले, थोड्याच वेळात आक्रित घडलं, जळगावात आई-बापासह दोन लेकरांची रेल्वे ट्रॅकवर बॉडी; घातपाताचा संशय


Amalner Takarkheda Family of Four Members Died Railway Track : पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर टाकरखेडा परिसरात शोककळा पसरली असून चौघांच्या मृत्यूने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे.

Amalner Takarkheda Family of Four Members Died Railway Track
टाकरखेडा आई वडिलांसह मुलांचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात टाकरखेडा येथे आज गुरुवारी पहाटे एकाच कुटुंबातील पती-पत्नीसह त्यांच्या दोन मुलींचा रेल्वे मार्गावर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर टाकरखेडा परिसरात शोककळा पसरली असून चौघांच्या मृत्यूनं ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे.

रेल्वे मार्गावर चौघांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार,टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल, त्याची पत्नी पार्वती भिल आणि दोन्ही मुली, हे पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर धरणगाव ते अमळनेर दरम्यानच्या रेल्वे मार्गावर चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मृतांमधील एका मुलीचं वय शालेय शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात तर दुसरी मुलगी अंगणवाडीमध्ये जात असल्याची माहिती मिळाली आहे.

Maharashtra TimesNanded News : कामांची बिले देण्यासाठी पाच लाखांची मागणी, कर्जबाजारीपणाला कंटाळले; नांदेडच्या कंत्राटदाराने नवी मुंबईत स्वत:ला संपवलं

पोलिसांचं पथक घटनास्थळी

आज गुरुवारी पहाटे सुमारे 4.40 वाजता पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अमळनेर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने पोलिसांचं पथक घटनास्थळी पाठवलं. सहाय्यक गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. घटनेची माहिती गावात पोहोचताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. एकाच कुटुंबातील चौघांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत होती. कुटुंबातील दोन मुलांचाही मृत्यू झाल्यानं या घटनेचं गांभीर्य अधिक वाढलं आहे.

कुटुंब पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर

मिळालेल्या माहितीनुसार, भिल कुटुंब पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर पडलं होतं. त्यानंतर काही वेळातच रेल्वे प्रशासनाकडून पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. मात्र कुटुंब नेमकं कोणत्या परिस्थितीत घराबाहेर पडलं आणि त्यानंतर काय घडलं? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या घटनेपूर्वी कुटुंबात काही कौटुंबिक किंवा अन्य प्रकारचा वाद होता का, याचीही चौकशी केली जात आहे. सध्या याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे केवळ चर्चेच्या आधारे कारण निश्चित करणं योग्य ठरणार नसून पोलीस तपासातूनच घटनेमागील पार्श्वभूमी स्पष्ट होणार आहे.

Maharashtra TimesMPSC Paper Leak : गर्लफ्रेण्डला खुश करायला गौरवने पेपर फोडला, पण औषध निरीक्षक होताच तिने ब्रेकअप केलं, पठ्ठ्याची पोलिसांना टिप, चॅटिंगही समोर

प्राथमिक चर्चेत कौटुंबिक कारणाचा उल्लेख

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांकडून तसेच नातेवाईकांकडून माहिती घेतली जात आहे. घटनेपूर्वीची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक अडचणी किंवा अन्य काही कारण होते का? यासह विविध शक्यता तपासल्या जात आहेत. घटनेचं नेमकं कारण अद्याप अधिकृतपणे समोर आलेलं नाही. प्राथमिक चर्चेत कौटुंबिक कारणाचा उल्लेख होत असला तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. एकाच कुटुंबातील चार जणांचा एकाच घटनेत मृत्यू झाल्यानं टाकरखेडा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेनं ग्रामस्थांना मोठा धक्का बसला असून, कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच या दुर्दैवी घटनेमागील नेमकं कारण आणि घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा