Headlines

Sunetra Pawar: कंपन्यांच्या वेळेत बदल करा; वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचना – maharashtra dcm sunetra pawar meeting on chakan industrial area road problems


Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आढावा बैठक घेऊन चाकण येथील समस्यांवर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Anderson Phillip Catch - 2026-08-27T070900
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी, पुणे: चाकण औद्योगिक परिसरातील रस्त्यांवरील खड्डे आणि बाजूपट्ट्यांची दुरुस्ती येत्या ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले असून, रस्त्यांवरील अतिक्रमणांविरोधात येत्या शुक्रवारपासून कारवाई सुरू करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गर्दीच्या वेळेत जड वाहनांवर निर्बंध आणण्याबरोबरच औद्योगिक कंपन्यांच्या पाळ्यांच्या वेळांमध्ये बदल करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आढावा बैठकीत बुधवारी दिल्या.

पवार यांनी बुधवारी शासकीय विश्रामगृहात चाकण परिसरातील विविध प्रश्न आणि चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. या वेळी खेड-आळंदीचे आमदार बाबाजी काळे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.

Maharashtra TimesNana Patole: महाजेनकोत 10 हजार कोटींचा घोटाळा? नाना पटोलेंचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीची मागणीचाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; तसेच ३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविण्याचे आणि बाजूपट्ट्यांची दुरुस्ती पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून, कामात दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. स्वतंत्रपणे उपाययोजना करण्याचेही प्रशासनाने ठरविले आहे. ‘चाकणमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. येत्या शुक्रवारपासून अतिक्रमणांवर कारवाई सुरू करून महिनाभरात ती पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अतिक्रमण काढताना कोणाचीही गय केली जाणार नाही; म नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,’ असे आवाहन त्यांनी केले.

Maharashtra TimesKolhapur Gokul Election : गोकुळच्या रणांगणात सतेज पाटील आणि भाजप जिल्हाध्यक्षांच्या भेटीमुळे नवा ट्विस्टनवी पोलिस ठाणे उभारण्याची कार्यवाही

‘उपाययोजनांमुळे कामगारांच्या ये-जा करण्याच्या वेळेत होणारी वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न आहे; तसेच संबंधित सर्व विभागांची दर शुक्रवारी बैठक घेऊन केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. चाकण परिसरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि वाहतुकीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे सुनेत्रा पवार यांनी या वेळी सांगितले. आवश्यकतेनुसार नवीन पोलिस ठाणी उभारण्याबाबतही कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चाकणच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व संबंधित सरकारी यंत्रणा एकाच व्यासपीठावर आल्या असून, विविध प्रश्नांचा अभ्यास करून टप्प्याटप्प्याने कार्यवाही केली जात आहे. रस्ते, वाहतूक, पार्किंग, अतिक्रमण या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करून चाकण परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यावर भर दिला जात आहे.-सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा