Pooja Birari: ‘मुलगा छान आहे, आपण पुढे जायला हरकत नाही’, वडिलांनी भावावर सोपवलेली लग्नाची जबाबदारी, पूजा बिरारीनं सांगितला सोहम आणि तिच्या भावाच्या भेटीचा किस्सा
Pooja Birari: ‘मुलगा छान आहे, आपण पुढे जायला हरकत नाही’, वडिलांनी भावावर सोपवलेली लग्नाची जबाबदारी, पूजा बिरारीनं सांगितला सोहम आणि तिच्या भावाच्या भेटीचा किस्सा
मुंबई: मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक लाडकं सेलिब्रिटी कपल म्हणजे अभिनेता आणि निर्माता सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी. काही महिन्यांपूर्वीच दोघांनी लग्नगाठ बांधली. दोघांनी नात्याची कबूली दिल्यानंतर चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. या दोघांची लव्हस्टोरी देखील तितकीच फिल्मी आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजानं वडिलांनी लग्नाची जबाबदारी तिच्या भावावर सोपवली होती, असं सांगितलं.
सोहम बांदेकरला भेटण्यासाठी वडिलांनी भावावरच सोपवली होती मोठी जबाबदारी!
दरम्यान, एका मुलाखतीमध्ये पूजानं तिच्या नात्याबद्दल घरातील मंडळींना कसं सांगितलं आणि सोहम व तिच्या भावाची (तुषार बिरारी) पहिली भेट कशी झाली, याचा रंजक किस्सा शेअर केलाय. पूजानं सोहमबद्दल घरी सांगितलं तेव्हा वडिलांनी सोहमला भेटण्याची जबाबदारी मोठा भाऊ तुषारवर सोपवली होती. तू त्याला भेट असं त्यांनी त्याला सांगितलेलं.
पूजानं सांगितलं की, तिच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयामध्ये तिचा मोठा भाऊ तुषार तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. तुषार कामानिमित्त जर्मनीमध्ये असतो. गणेशोत्सवाच्या काळात तो अचानक भारतात घरी आला होता, आणि त्याच वेळी पूजानं आपल्या कुटुंबाला सोहम बांदेकरबद्दल सांगितलं होतं. तेव्हा ‘तू त्या मुलाला भेटून ये आणि तो कसा आहे ते बघ’, असं वडिलांनी तुषारला सांगितलं होतं. दोघे कॉफीसाठी भेटा हवं तर, असंही वडिलांनी सांगतिलं होतं. तेव्हा सोहम म्हणाला होता की, कॉफीसाठी वगैरे कशाला घरीच भेटू आपण. तेव्हा दादा त्यांच्या घरी गेला होता. तेव्हा त्यानं घरी सांगितलं की, ‘मुलगा खूप छान आहे, आपण पुढे जायला हरकत नाही’.
फक्त लग्नाबाबतच नव्हे, तर तिच्या अभिनयाच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक मालिकांच्या ऑडिशन्सच्या वेळीही तिचा भाऊ तिच्यासोबत असायचा. भावाच्या
या पाठिंब्यामुळंच ती आज इथपर्यंत पोहोचू शकली असल्याचे तिनं आवर्जून नमूद केलं.
पूजाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं तिचं शिक्षण पुण्यातून पूर्ण केलं. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या पूजाने झी युवावरील ‘साजणा’ मालिकेतून (रमाची भूमिका) मुख्य अभिनेत्री म्हणून मराठी मालिकांमध्ये पदार्पण केलंय. या मालिकेतील तिच्या साध्या-सोप्या आणि प्रभावी अभिनयाचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केलं. यानंतर स्टार प्रवाहवरील ‘स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा’ या मालिकेतील ‘पल्लवी’च्या भूमिकेनं तिला महाराष्ट्राच्या घराघरांत ओळख मिळवून दिली. तिने साकारलेली स्वाभिमानी आणि जिद्दी पल्लवी प्रेक्षकांना खूप आवडली. याशिवाय ‘येडं लागलं प्रेमाचं’ या मालिकेतही ती मुख्य भूमिकेत दिसून आली. नुकताच या मालिकेनं निरोप घेतला.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा