Headlines

Kushal Badrike : भाऊ कदमच्या एका प्रश्नानं राहुल देशपांडेंना आलेला राग, कुशल बद्रिकेनं सांगितला ‘चला हवा येऊ द्या’चा किस्सा


Kushal Badrike : कुशल बद्रिकेनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ‘चला हवा येऊ द्या’चा किस्सा सांगितला आहे.

Kushal Badrike Shares Incident Of Rahul Deshpande In Chala Hawa Yeu Dya
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – छोट्या पडद्यावरील ‘ चला हवा येऊ द्या ‘ या कार्यक्रमानं अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली आणि प्रेक्षकांचं भरघोस प्रेम मिळालं. अनेक कलाकार मंडळींनी ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये हजेरी लावलेली. शास्त्रीय गायक राहुल देशपांडेही एकदा या कार्यक्रमामध्ये झळकले होते. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये कुशल बद्रिकेनं ‘चला हवा येऊ द्या’ मधील राहुल देशपांडे यांचा किस्सा सांगितला आहे. भाऊ कदम यांनी संगीतावर आधारित विचारलेला प्रश्न राहुल यांना आवडला नसल्याचं कुशलनं सांगितलं.

कुशल बद्रिकेनं सांगितला किस्सा

मुलाखतीदरम्यान कुशल बद्रिके म्हणाला की, ‘आम्ही प्रेक्षकांमध्ये जाऊन विशिष्ट व्यक्तीच्या बाजूला जाऊन बसायचं आणि पाहुण्यांना प्रश्न विचारायचे, अशी नवीन विनोदाची पद्धत सुरू केली होती. त्यानंतर आमच्याकडे राहुल देशपांडे आले होते. भाऊ कदमने प्रेक्षकांमध्ये बसून प्रश्न विचारण्यासाठी हात वर केला. तर राहुलसर म्हणाले की, ‘हो. विचारा प्रश्न.’ त्यावर भाऊ म्हणाला, ‘तुम्ही जे गाणं गाता, तर ते कुठल्या ना कुठल्या रागात गाता.’ तर त्यांनी ‘हो’, असं उत्तर दिलं. भाऊ कदम पुढे म्हणाला, ‘एवढा कसला राग येतो तुम्हाला? रागात कशाला गायचं ना गाणं?’
Maharashtra TimesSalman Khan : थकलेले डोळे अन् बारीक शरीरयष्टी; सलमान खानला झालं तरी काय? चाहते चिंतेत, Video व्हायरल
‘भाऊ कदमच्या या प्रश्नावर राहुल देशपांडे यांना कदाचित हा त्यांच्या कलेचा अपमान वगैरे होतोय का काय? असं वाटलं असावं. आम्ही आपली गंमत म्हणून करायला गेलो होतो. पण त्यांना असं वाटलं की, हा जरा चुकीचा प्रश्न आहे. त्यांचा एकदम चेहरा बदलला आणि ते एकदम गंभीर झाले. त्यानंतर आमच्या सेटवर एकच शांतता पसरली. कारण, आलेल्या पाहुण्यांना विनोदातून त्यांचा अपमान झाल्यासारखं वाटतंय आणि आलेले पाहुणेसुद्धा कोण? तर इतके मोठे शास्त्रीय गायक राहुल देशपांडे. त्यानंतर मी हात वर केला आणि प्रश्न विचारला. मी म्हणालो, ‘सर, आता माझी सटकली, मला राग येतोय, हे गाणं कोणत्या रागात गायलं आहे?’ त्यावर राहुल सर उठले आणि आम्हाला हसून म्हणाले, ‘अरे! तुम्ही धन्य आहात रे पोरं, धन्य आहात आणि ते हसायला लागले. त्यानंतर पुन्हा एकदा वातावरण निवळलं आणि शांत झालं.’ असं कुशल बद्रिकेनं पुढे सांगितलं.

माझ्या नवऱ्याची बायकोतील अभिजीतच्या भूमिकेमुळे टोमणे, Sukhada Khandkekar ने उलगडले धमाल किस्से

शेवटी कुशल म्हणाला की, ‘त्यावेळी असा विनोद कसा सुचला? ते कसं झालं आणि काय झालं हे माहीत नाही. मला वाटतं की, ती एक दैवी वेळ असते आणि त्या वेळेला देव आपल्याला अशा गोष्टी देत असतो.’ ‘सर्व काही’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कुशल बोलत होता.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा