Chhatrapati sambhajinagar student assaulted during argument with neighbors attacked with iron rod vandalism of house and car; वादातून विद्यार्थिनीचा विनयभंग; आई, वडिलांना लोखंडी रॉडने मारहाण तर घरासह कारचीही केली तोडफोड
Chhatrapati sambhajinagar student assaulted during argument with neighbors attacked with iron rod vandalism of house and car; वादातून विद्यार्थिनीचा विनयभंग; आई, वडिलांना लोखंडी रॉडने मारहाण तर घरासह कारचीही केली तोडफोड
छत्रपती संभाजीनगर: कामगार कॉलनीत असलेल्या सामाईक बोळीत घराचा दरवाजा ठेवण्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादातून एका विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला. तसेच विद्यार्थिनीच्या आईच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून जखमी केले. तर वडिलांचा गळा दाबून आणि कार अंगावर घालून जखमी केले. या मारहाणीनंतर घरात घुसून तोडफोड करत तलवार दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना १७ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास चिकलठाणा येथील कामगार कॉलनीत घडली.
या प्रकरणात २० वर्षीय विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, १७ जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या दीपक तुपे याच्या घराचे बांधकाम सुरू होते. बांधकामासाठी आणलेला दरवाजा सामाईक बोळीत ठेवू नका असे पीडितेचे वडील दीपक तुपे याला सांगत होते. या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. वाद घालणाऱ्यांनी वडील व आईला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर ज्ञानदेव तुपे याने पीडितेच्या वडिलांचा गळा दाबला, तर तिच्या आईच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून जखमी केले, अशी माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. तसेच मारहाण करणाऱ्यांनी पीडितेला खाली पाडून तिच्या हाताला चावा घेत अंगावरील कपडे फाडण्यात आले. तसेच तिच्या डोक्यावर दगड मारून जखमी करण्यात आले.
यानंतर सुशील व संगीता तुपे यांनी पीडितेला केस धरून फरफटत नेले. सागर ऊर्फ साई तुपे याने कार अंगावर घातल्याने पीडिता व तिची आई जखमी झाली. सुशील याने तलवार काढून जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. याशिवाय सागर ऊर्फ साई तुपे, दीपक तुपे, लखन कांबळे व राजरत्न बनकर यांनी घराच्या दरवाज्याच्या काचा, कार क्रमांक एमएच-२०-डीव्ही-७०३४ पुढील काच, दुचाकीचा हेडलाइट, टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरा व डीव्हीआरची तोडफोड केली. डीव्हीआर घेऊन गेल्याची माहिती तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात मारहाण करणाऱ्या दीपक श्रीरंग तुपे, ज्ञानदेव राजाराम तुपे, सुनील ज्ञानदेव तुपे, संगीता ज्ञानदेव तुपे, सुशील ज्ञानदेव तुपे, सागर ऊर्फ साई ज्ञानदेव तुपे, राजरत्न रामराव बनकर आणि लखन कांबळे यांच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा