मुंबई – मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अभिनेत्री सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. समाजातील अनेक घडामोडींवर अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करते. अशातच आता स्पृहानं सोशल मीडियावर शेअर केलेली कविता चर्चेचा विषय ठरली आहे. या कवितेतून स्पृहानं धर्मावरून होणारे वाद, उपोषण, आंदोलन, हिंसा या सगळ्या विषयांवर प्रकाश टाकला आहे.
Phulwa Khamkar : अनिल बर्वेंची लेक झाली खामकर मसालेवाल्यांची सून, मराठीसह ‘फुलवा’ बॉलिवूडमध्ये गाजली
‘आमचं इथं अगदी व्यवस्थित चाललंय संवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटलंय आमचं इथं अगदी व्यवस्थित चाललंय’
‘रोजच उठून चालू आहे निष्पापांचे आक्रंदन घुसमटणाऱ्या श्वासाचं रोजचेच आहे मूक रुदन बोलू पाहणाऱ्या आवजाला आम्ही कधीच गप्प केलंय संवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटलंय’
‘किती बॉम्बस्फोट, किती दंगली माणसं मरतायत, मरू देत आपण त्यात नव्हतो ना चला आजची रात्र टळू देत उपोषण होतात, मोर्चे निघतात, झुरळं चक्क रस्त्यावर उतरतात मत, विरोध, अजेंडा, धर्म, चर्चा बिर्चा नकोच काही मुद्दा-प्रश्न खड्ड्यात गेले, हे तर नुसते देशद्रोही निर्लज्जपणे आम्ही स्वत:लाच ठासून सांगितलंय अन् संवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटलंय’
‘मनामध्ये एक प्रचंड भीती, काय हा जीव उद्या पाहील? सांगताय कुणाला, लोंबकळा ट्रेनला, आजची भाकरी कोण देईल? तसा फरक पडत नाही, जगाचं जगणं थांबतं नाही आमच्या संथ आयुष्यावर एक ओरखडाही उमटत नाही अगतिकतेच तत्वज्ञान आम्ही स्पिरिट म्हणून बोकाळलंय अन् संवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटलंय’
‘एकच वाटतं अशावेळी तरी धावून यावेत सारे हात रक्त देताना तरी विचारू नये काय तुझी धर्म जात रक्ताचा रंग सारखाच असतो हे खोल कुठेतरी मनात जपलंय नाहीतर संवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटलंय’
ही कविता शेअर करत स्पृहानं, ‘कोणत्याही जीवित, मृत..मृत होऊ घातलेल्या, अथवा आतून मृत झालेल्या व्यक्ती, संवेदनशीलता वा लोकशाहीशी पूर्ण संबंध आहे.’ असं कॅप्शन लिहिलं आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा