Headlines

पदवीधरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच;‎महायुतीचा उमेदवार मीच- आ. चव्हाण‎:पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचा भाजपचा दावा‎



विधान परिषदेच्या मराठवाडा ‎पदवीधर मतदारसंघ महायुतीत ‎‎राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार ‎‎आहे. महायुतीचा उमेदवार मीच ‎‎असेल, असा दावा आमदार सतीश ‎‎चव्हाण यांनी रविवारी (१९ जुलै)‎येथे पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, ‎‎भारतीय जनता पक्षाकडूनही ‎पदव

.

आमदार चव्हाण यांची मुदत‎डिसेंबर महिन्याच्या पहिल्या‎आठवड्यात संपणार आहे. त्यामुळे‎ऑक्टोबर महिन्यापासून पदवीधर‎मतदारसंघातील निवडणुकीचे‎वेळापत्रक घोषित होण्याची शक्यता‎आहे. आमदार चव्हाण म्हणाले की,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आतापर्यंत ३ लाखांपेक्षा अधिक‎नोंदणी झाली आहे. नोंदणी करताना‎काही अडचणी येत आहेत.‎त्याबाबत विभागीय आयुक्तांसोबत‎मी भेट घेऊन या समस्या मांडणार‎आहे. पक्षाकडून माझ्याच नावाला‎पसंती असून, सर्वेक्षणात माझेच नाव‎आघाडीवर आहे. पक्षाने‎निवडणुकीची तयारी सुरू केली‎आहे.‎ महायुतीतील इतर पक्ष देखील‎तयारी करत असल्याबाबत विचारले‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎असता, प्रत्येक पक्ष निवडणुकीसाठी‎तयारी करतो. मात्र, ही जागा आमची‎असल्याचे त्यांनी सांगितले.‎

विधान परिषदेच्या पदवीधर‎मतदारसंघाची निवडणूक पुढील‎वर्षी डिसेंबर महिन्यात अपेक्षित‎आहे. आमदार चव्हाण यांनी तीन‎वेळा या मतदारसंघात विजय‎मिळवला आहे. भाजपचे श्रीकांत‎जोशी यांचा पराभव करून चव्हाण‎यांनी या मतदारसंघात पहिली‎निवडणूक जिंकली होती.‎

तयारी पूर्ण, पण लढण्याचा निर्णय वरिष्ठ घेतील- केणेकर‎

भाजपकडून माजी आमदार संजय केणेकर यांना नोंदणी प्रमुख करण्यात आले‎ आहे. याबाबत केणेकर यांनी सांगितले की, आम्ही भाजप जिंकून येईल एवढी ‎नोंदणी केली आहे. त्यामुळे जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली, असे काही नाही.‎भाजप ही जागा लढवणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा देखील भाजप ‎जिंकले आहे. ही जागा देखील भाजपच जिंकेल. हा मतदारसंघ अन्य कोणत्या ‎पक्षासाठी सोडायचा असेल, तर त्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल.‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत