Poonam Pandey Viral Video : अभिनेत्री पूनम पांडे देखील ‘कॉकरोच जनता पार्टी’ला पाठिंबा देण्यासाठी जंतर मंतरवर पोहोचली असून अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – पूनम पांडे रविवारी दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनात सहभागी झाली. नीट (NEET) वादाच्या पार्श्वभूमीवर केवळ विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आली, असल्याचं अभिनेत्रीनं सांगितलं. या प्रकरणाला राजकीय किंवा धार्मिक मुद्दा न बनवता विद्यार्थ्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन अभिनेत्रीनं केलं.
काय म्हणाली पूनम पांडे?
एएनआयने (ANI) शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये पूनम पांडे म्हणाली, ‘या आंदोलनाची चर्चा संपूर्ण सोशल मीडियावर आणि भारतभर होत आहे. जनता आणि हे विद्यार्थी केवळ उत्तरांची मागणी करत आहेत आणि म्हणूनच मी इथे आले आहे. मी सरकारला मनापासून विनंती करते की, कृपया त्यांचं ऐकावं. सोनम वांगचुक आधीच आजारी आहेत.’ Kushal Badrike : भाऊ कदमच्या एका प्रश्नानं राहुल देशपांडेंना आलेला राग, कुशल बद्रिकेनं सांगितला ‘चला हवा येऊ द्या’चा किस्सा पूनम पुढे म्हणाली, ‘या प्रकरणाला धार्मिक किंवा राजकीय मुद्दा बनवू नये. कोण काय करत आहे किंवा कोणी काय केलं, या वादात पडू नका. ते चुकीचं आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे हे आंदोलन सुरू झालं. आज या मुद्द्याला वेगळंच वळण लागलं आहे. मला माहित आहे की, उद्या मोर्चा आहे. तिथे काही समस्या किंवा लाठीचार्ज होऊ शकतो, आणि मला त्याची जाणीव आहे. पण मी फक्त प्रार्थना करत आहे की, विद्यार्थ्यांना आणखी त्रास होऊ नये. ते आधीच खूप त्रस्त आहेत.’
आयएएनएसने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये पूनम पांडे म्हणाली, ‘मी इथे फक्त विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आले आहे. मी त्यांच्या हक्कांसाठी लढायला आले आहे. इतर गोष्टींबद्दल बोलायचं झाल्यास, मला राजकारणाबद्दल काहीही माहिती नाही. मी इथे फक्त विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्या मुलांनी आत्महत्या केली, त्यांच्यासाठी मी इथे आहे. मी फक्त त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथे आले आहे.’ Savita Malpekar : 10 दिवस लेक कोमात, डॉक्टरांनीही आशा सोडलेली; सविता मालपेकर यांनी सांगितला प्रसंग, आलेली स्वामींची प्रचिती इतकंच नाही, तर पूनम पांडेनं विद्यार्थ्यांसोबत ‘जय भीम’, ‘भारत माता की जय’ आणि ‘इन्किलाब जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या.
hunger strike मुळे Sonam Wangchuk यांची प्रकृती गंभीर, २० व्या दिवशीही म्हणाले ‘मी मरणार नाही..’
सीजेपीचं आंदोलन, सोनम वांगचुक यांची प्रकृती
सीजेपीने ३ मे रोजी झालेल्या राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET)-UG शी संबंधित अनियमितता आणि पेपरफुटीच्या आरोपांवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. २८ जूनपासून जंतर मंतर येथे उपोषणावर बसलेल्या कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांना शनिवारी पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हटवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. Shreyas Talpade : ‘माझ्या हृदयाचे ठोके १० मिनिटांसाठी थांबलेले’, श्रेयस तळपदेला आलेला हृदयविकाराचा झटका, अभिनेत्यानं सांगितला प्रसंग दरम्यान, सोनाक्षी सिन्हा, हृतिक रोशन, शत्रुघ्न सिन्हा, ओम पुरी, झीनत अमान, स्वरा भास्कर, सोनिया राझदान आणि इतर अनेक सेलिब्रिटींनीही यापूर्वी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा