Headlines

Shreyas Talpade : ‘माझ्या हृदयाचे ठोके १० मिनिटांसाठी थांबलेले’, श्रेयस तळपदेला आलेला हृदयविकाराचा झटका, अभिनेत्यानं सांगितला प्रसंग


Shreyas Talpade : ३ वर्षांपूर्वी श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आलेला. अभिनेत्यानं एका मुलाखतीमध्ये त्या कठीण प्रसंगाबद्दल सांगितलं आहे.

Shreyas Talpade Shares Cardiac Arrest Incident
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे गेल्या २० वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत असून अभिनेता नुकताच ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात दिसला. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान डिसेंबर २०२३ मध्ये श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला. त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. शूटिंगदरम्यान अभिनेत्याची प्रकृती खालावलेली. श्रेयस शुद्धीवर आल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अशातच आता श्रेयसनं या प्रसंगाबद्दल सांगितलं आहे.

श्रेयस तळपदेनं सांगितला प्रसंग

श्रेयस म्हणाला की, हे त्याचं दुसरं आयुष्य आहे. या घटनेनंतर त्यानं आयुष्यात अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. ‘तो काळ माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण आणि धक्कादायक होता’ असं श्रेयस म्हणाला.
Maharashtra TimesKushal Badrike : भाऊ कदमच्या एका प्रश्नानं राहुल देशपांडेंना आलेला राग, कुशल बद्रिकेनं सांगितला ‘चला हवा येऊ द्या’चा किस्सा
श्रेयस म्हणाला की, ‘त्यानंतर आमचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. पूर्वी मी फक्त कामालाच प्राधान्य द्यायचो. माझं काम माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. मी नेहमी म्हणायचो की, मला काम तर करायलाच हवं, पण त्याचबरोबर माझ्या कुटुंबालाही चांगला वेळ द्यायला हवा. पण सगळं काही त्या एका क्षणात घडलं. मी मृत्यू पाहिला आहे. माझ्या हृदयाचे ठोके १० मिनिटांसाठी थांबले होते. त्यांना मला पुन्हा जिवंत करावं लागलं. जसं तुम्ही चित्रपटांमध्ये पाहता, त्यांनी मला सीपीआर दिला, त्यानंतर माझ्या हृदयाला पुन्हा सुरू करण्यासाठी इलेक्ट्रिक शॉक दिला.’

मर्दिनी सिनेमाला बॉलिवूडमधून मागणी, श्रेयस तळपदे राहिला अडून- हा विषय मराठीतच करणार!

श्रेयस तळपदेनं सांगितलं की, त्याला गाडीतच हृदयविकाराचा झटका आला. त्याच्या पत्नीनं त्याची काळजी घेतली आणि त्याला तातडीनं रुग्णालयात नेलंं. अभिनेत्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. श्रेयस म्हणाला की, ‘त्या क्षणामुळे आयुष्यात काम हेच सर्वस्व नाही, याची मला जाणीव झाली.’ आता तो आपल्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवतो. ‘कर्ली टेल्स’ या यूट्यूब चॅनलवर श्रेयस तळपदेनं आयुष्यातील कठीण प्रसंग सांगितला आहे.
Maharashtra TimesSavita Malpekar : 10 दिवस लेक कोमात, डॉक्टरांनीही आशा सोडलेली; सविता मालपेकर यांनी सांगितला प्रसंग, आलेली स्वामींची प्रचिती
दरम्यान, ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाबद्दल सांगायचं तर या सिनेमात श्रेयस तळपदेसोबत अक्षय कुमार, अर्शद वारसी, राजपाल यादव, परेश रावल, सुनील शेट्टी यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा