Rohit Sharma Hundred : भारत आणि इंग्लंडमधील तिसऱ्या वनडे सामन्यात ३८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने तुफानी शतकी खेळी करत इतिहास रचला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरु आहे. मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघासाठी हा सामना प्रतिष्ठेचा आहे. टॉस जिंकत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. बेन डकेटच्या १४१ धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने ५० षटकांत ३ गडी गमावून ३८७ धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा याने शतकी खेळी केली. रोहितने १३८ धावा करताना लॉर्ड्स मैदानावर शतक करत सर्वाधिक धावा करणारा एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर टीका झेलणाऱ्या रोहितने आज दमदार कमबॅक केले. रोहितने केवळ ८४ चेंडूत शतक पूर्ण करत वनडेमधील आपले ३४ वे शतक नोंदवले. यामध्ये त्याने १० चौकार आणि १ षटकार खेचला असून अजूनही तो मैदानात खेळत आहे. रोहितच्या या शतकाची खासियत म्हणजे इंग्लंडच्या भूमीवर त्याचे हे ८ वे एकदिवसीय शतक आहे. इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचला. सध्या भारताने एक गडी गमावून चांगल्या स्थितीत मजल मारली आहे. FIFA WC Final : अमेरिकेत नेमकं काय झालंय? अनेक राज्यांमध्ये धूरच धूर, FIFA वर्ल्ड कप फायनल मॅचवर परिणाम होण्याची शक्यता, जाणून घ्या कारण ३८८ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली होती. मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सुरुवातीलाच इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी १४७ धावांची भागीदारी केली. ही लॉर्ड्सच्या मैदानावरील दुसरी सर्वात मोठी सलामी भागीदारी ठरली आहे. रोहित शतक झाल्यावर आक्रमक पवित्रा घेत खेळत होता. मात्र ३९ व्या ओव्हरमध्ये १३८ धावांवर असताना बेथलने त्याला बोल्ड केले. रोहितने आपल्या खेळीत ११० चेंडूत १३८ धावा करताना १७ चौकार आणि ५ षटकार मारले होते. रोहितने शतकासह लॉर्ड्स मैदानावर सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये त्याने तिसरे स्थान गाठले आहे. पहिल्या स्थानी IND vs ENG 3rd ODI : IPL स्टार्सची मोक्कार धुलाई, इंग्लंडचे 388 धावांचे टार्गेट, लॉर्ड्सवर भारताचा लाजिरवाणा वर्ल्ड रेकॉर्ड दरम्यान, डकेटशिवाय जेकब बेथलने ९१, जो रूटने ७४ आणि जोस बटलरने ४१ धावांचे योगदान दिले. भारतीय गोलंदाजांना सुरुवातीला धक्के देता आले नाहीत.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा