jasprit bumrah not travelling with team india initially for sri lanka tests ; फिटनेस टेस्ट पास करणारा बुमराह श्रीलंका कसोटी खेळणार की नाही? बीसीसीआयनं ठेवला सस्पेन्स, काय घडतंय?
jasprit bumrah not travelling with team india initially for sri lanka tests ; फिटनेस टेस्ट पास करणारा बुमराह श्रीलंका कसोटी खेळणार की नाही? बीसीसीआयनं ठेवला सस्पेन्स, काय घडतंय?
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी जसप्रीत बुमराहबाबत मोठी माहिती समोर आली आहे. फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केल्यानंतरही टीम इंडिया त्याच्याबाबत घाई करण्याच्या मनःस्थितीत नाही.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका १५ ऑगस्टपासून सुरू होत आहे. काल भारताच्या चाहत्यांसाठी मोठी अपडेट समोर आली होती. पण जसप्रीत बुमराहने त्याची फिटनेस टेस्ट पास केली असली, तरी टीम मॅनेजमेंट त्याच्या बाबतीत कोणतीही घाई करू इच्छित नाही. बुमराहने पूर्णपणे लयीत यावे, यासाठी त्याला पुरेसा वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतीय संघासोबत प्रवास करणार नाही?
भारतीय संघ ३ आणि ४ ऑगस्ट रोजी मुंबईहून श्रीलंकेसाठी रवाना होणार आहे. मात्र, जसप्रीत बुमराह या प्रवासात सुरुवातीला संघासोबत असणार नाही. पहिला कसोटी सामना १५ ऑगस्ट रोजी गॉल येथे खेळवला जाणार आहे. बुमराहचा संघात समावेश करण्यात आला आहे, तरीही त्याला विश्रांती देऊन मगच संघासोबत जोडले जाणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स एकदिवसीय सामन्यादरम्यान बुमराहला दुखापत झाली होती. त्यानंतर वैद्यकीय टीमच्या सल्ल्यानुसार त्याने ८ ते १० दिवस पूर्ण विश्रांती घेतली. विश्रांतीचा हा काळ संपल्यानंतर तो बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सीलन्समध्ये दाखल झाला. शनिवार म्हणजेच आजपासून तो नेटमध्ये गोलंदाजीचा सराव सुरू करणार आहे. तसेच हळूहळू तो आपल्या गोलंदाजीची तीव्रता वाढवणार आहे.
गॉल कसोटीपूर्वी संघात सामील होण्याची शक्यता
भारतीय संघ ७ ऑगस्टपासून कोलंबोमध्ये चार दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. बुमराह बंगळुरूमध्ये आपल्या गोलंदाजीचा सराव करेल. सर्व वैद्यकीय प्रोटोकॉल पूर्ण केल्यानंतर आणि फिटनेसची खात्री पटल्यानंतरच तो पहिल्या कसोटी सामन्याच्या आधी गॉलमध्ये भारतीय संघात सामील होईल.
जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) मालिकेच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय संघात अनेक दुखापतींच्या समस्या असताना बुमराह पूर्णपणे फिट होऊन संघात परतणे आवश्यक आहे. त्यामुळेच टीम मॅनेजमेंट त्याच्याबाबतीत कोणतीही घाई किंवा रिस्क घेण्यास तयार नाही.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा