PF खातेधारकांसाठी आधार कार्ड आणि PF खात्यावरील नावामध्ये तफावत असणे अत्यंत अडचणीचे ठरू शकते. यामुळे पैसे काढताना किंवा पेन्शन मिळवताना अडथळे येतात. EPFO पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ‘जॉइंट डिक्लेरेशन’ या ऑनलाईन सुविधेचा वापर करून युजर्स घरबसल्या डिजिटल पद्धतीने ही चूक अवघ्या काही दिवसांत कशी दुरुस्त करू शकतात, याची सविस्तर माहिती पुढे जाणून घेऊया.

EPFO ने त्यांच्या पोर्टलवर ‘जॉइंट डिक्लेरेशन’ ही अत्यंत सोपी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे तुम्ही नाव, जन्मतारीख किंवा लिंग यातील चुका अगदी सहज दुरुस्त करू शकता.
ऑनलाईन नाव दुरुस्तीची सोपी पद्धत
- पोर्टलला भेट द्या: सर्वात आधी ईपीएफओच्या अधिकृत EPFO Member Unified Portal वर जा. (REF.)
- लॉगिन करा: तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा.
- ‘Manage’ पर्याय निवडा: मुख्य स्क्रीनवर वरच्या बाजूला असलेल्या मेनूमध्ये ‘Manage’ या पर्यायावर क्लिक करा आणि ड्रॉपडाउनमधून ‘Joint Declaration’ हा पर्याय निवडा.
- सदस्य आयडी (Member ID) निवडा: तुमची ज्या पीएफ अकाऊंटमधील (Member ID) माहिती चुकली आहे, तो आयडी निवडा आणि ‘Get Details’ वर क्लिक करा.
- माहिती दुरुस्त करा: आता तुमच्या स्क्रीनवर दोन रकाने दिसतील. एकीकडे जुनी (चुकीची) माहिती असेल आणि दुसरीकडे ‘Correct Details’ चा रकाना असेल. तिथे तुमच्या आधार कार्डवर जसे नाव आहे,
- तसेच अचूक नाव टाईप करा.
- कागदपत्रे अपलोड करा: नाव दुरुस्तीच्या पुराव्यासाठी तुमचे आधार कार्ड किंवा इतर आवश्यक कागदपत्रांची पीडीएफ (PDF) फाईल अपलोड करा.
- अर्जाची पडताळणी (Aadhaar OTP): शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा आणि तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी (OTP) टाकून अर्जाची पडताळणी पूर्ण करा.
नाव दुरुस्तीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- नाव बदलण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी तुमच्याकडे खालीलपैकी किमान दोन कागदपत्रे असणे आवश्यक आहे:
- आधार कार्ड (Aadhaar Card) – हे सर्वात महत्त्वाचे आहे. (लक्षात ठेवा, पीएफ खात्यात तुम्ही जे नवीन नाव टाकणार आहात, ते तुमच्या आधार कार्डशी 100 टक्के मॅच झाले पाहिजे) [PF Aadhaar link name mismatch solve].
- पॅन कार्ड (PAN Card)
- पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदार ओळखपत्र (Voter ID)
- शाळेचे सोडल्याचे प्रमाणपत्र (Leaving Certificate) किंवा दहावीचे मार्कशीट
ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पुढे काय होते?
टप्पा 1: तुमचा अर्ज सर्वात आधी तुमच्या कंपनीच्या (Employer) लॉगिन पोर्टलवर जाईल. तुमच्या कंपनीने डिजिटल स्वाक्षरी करून अर्जाला मंजुरी देणे बंधनकारक आहे.
टप्पा 2: कंपनीच्या मंजुरीनंतर हा अर्ज ईपीएफओच्या प्रादेशिक कार्यालयाकडे (Field Office) जातो. तिथले अधिकारी कागदपत्रांची तपासणी करून साधारण 7 ते 15 दिवसांच्या आत तुमच्या पीएफ खात्यातील नाव अधिकृतपणे दुरुस्त करतात.

