Headlines

भारत वि. इंग्लंड तिसरा वनडे, कॅप्टन शुभमन गिल आज हुकमी एक्का बाहेर काढणार? टीममध्ये 2 मोठे बदल


IND vs ENG 3rd ODI Playing 11 : भारत वि. इंग्लंडमध्ये आज तिसरा वनडे सामना आज होणार आहे. या सामन्यामध्ये दोन मोठे बदल बदल होण्याची शक्यता असून कॅप्टन गिल हुकमी एक्का काढण्याची दाट शक्यता आहे.

IND vs ENG 3rd ODI
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्या मालिकेतील अखेरचा तिसरा वन-डे सामना आज, रविवारी होत असून, ही लढत जिंकून मालिकेत २-१ने बाजी मारण्यास भारतीय संघ उत्सुक असेल. याशिवाय सगळ्यांच्या नजरा लागतील त्या रोहित शर्मावर. ही वन-डे त्याच्या कारकिर्दीतील अखेरची आंतरराष्ट्रीय वन-डे असेल, असे वृत्त प्रसिद्ध झाल्याने रोहितप्रेमी आणि क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा रंगली. मात्र हे वृत्त निराधार असल्याचे बीसीसीआयने स्पष्टपणे सांगितले. या सामन्यामध्ये भारतीय प्लेंग ११ मध्ये दोन मोठे बदल पाहायला मिळू शकतात. कोणते जाणून घ्या.

आज प्लेइंग ११ मध्ये दोन मोठे बदल म्हणजे के.एल. राहुल आणि कुलदीप यादव यांना आज प्लेइंग मध्ये संधी भेटू शकते. या दोघांची एन्ट्री झाल्यावर संघातून वॉशिंग्टन सुंदर आणि ईशान किशन यांना बाहेर केले जाईल. ईशानला दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये राहुलला ताप आल्यामुळे तो बाहेर होता, म्हणूनच ईशानला त्याच्या जागी संधी मिळाली होती परंतु १ धावच करून तो आऊट झाला.
Maharashtra TimesPV Sindhu : सिंधू इज बॅक! पोरीने इतिहास रचला, जपान ओपन जिंकणारी पहिली भारतीय, दोन सेटमध्येच प्रतिस्पर्धी खेळाडूचा करेक्ट कार्यक्रम
मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत अपयशी ठरलेला भारताचा माजी कर्णधार स्वतःला सिद्ध करण्यासाठी नक्कीच जीवाचे रान करणार. फ्रंटफूटवर सुरेख पूल शॉट लगावणारा आणि फिरकी गोलंदाजांच्या माऱ्यावर मैदानाच्या चोहोबाजूंना फटकेबाजी करणारा रोहित या मालिकेत चमकला नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या शक्यतेला खतपाणीच मिळाले. ३९ वर्षांचा हा शैलीदार फटकेबाजीचा धनी असणारा फलंदाज पुढील वर्षी रंगणाऱ्या वर्ल्ड कप वन-डे स्पर्धेत खेळू शकणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली. मालिका जिंकण्यासाठी आजच्या सामन्यात विजयाचा गुलाल उधळावाच लागणार आहे.
Maharashtra TimesRohit Sharma : रोहितबद्दल चिंता नाही! इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वनडेपूर्वी हिटमॅनवर कोचने विश्वास दाखवला, 2027 वर्ल्डकपबाबत काय म्हणाले?
फलंदाजांच्या गुणवत्तेला आव्हान देणाऱ्या कार्डिफच्या खेळपट्टीवर रोहितने नऊ चेंडू निर्धाव खेळून काढले अन् त्यानंतर तो बाद झाला. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘लॉर्ड्स’ची खेळपट्टी फलंदाजांना मदत करते. अशा खेळपट्टीवर हरपलेला सूर पुन्हा मिळवण्यास रोहितला मदत मिळेल. कर्णधार म्हणून रोहितने पुढाकार घेत पावरप्लेमध्ये जोखीम पत्करत उपयुक्त फटकेबाजी केली. त्याचे चाहते रविवारी हाच ‘हिटमॅन’ रोहित पुन्हा पाहू इच्छितात. पहिल्या १० षटकांत त्याला जोफ्रा आर्चर याच्या वादळी चेंडूंचा सामना करावा लागेल.

भारत संभाव्य प्लेइंग 11 : रोहित शर्मा, शुभमन गिल (C), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK),शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, गुरनूर ब्रार, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा