Savita Malpekar : सविता मालपेकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंग सांगितला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सविता मालपेकर यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. नुकत्याच एका ‘देऊळ बंद २’ या सिनेमातही झळकल्या आहेत. सविता मालपेकर खऱ्या आयुष्यातही स्वामी भक्त आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सविता मालपेकर यांनी स्वामींचा अनुभव सांगितला आहे. सविता यांची लेक १० दिवस कोमात होती, त्यावेळी त्यांनी स्वामींचं नामस्मरण केलेलं आणि त्यांना स्वामींची प्रचीती आली होती.
सविता मालपेकर यांनी सांगितला प्रसंग
प्रसंग सांगताना सविता मालपेकर म्हणाल्या की, ‘२००३ मध्ये माझी मुलगी लंडनला शिकायला होती. तिला मॅनेनजेटिस हा आजार झाला. आदल्या दिवशी आम्ही फोनवर बोललो होतो. ११वी झाल्यानंतर ती तिथे गेलेली. दुसऱ्यादिवशी कॉलेजमधून फोन आला की, केतकीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ती कोमामध्ये गेलीये, व्हेन्टीलेटरवर आहे. मी एकटीच घरी होते. २ महिन्यांपूर्वी माझ्या सासूबाई गेल्या होत्या. माझे मिस्टर कोकणात गेले होते. मला काय करावं समजत नव्हतं. त्याच्या १५ दिवस आधी शरद उपाध्येंनी मला स्वामींचा फोटो दिला होता. मी त्या फोटोच्या समोर गेले आणि म्हणाले, ‘स्वामी, तारा-मारा जे काही करायचंय ते तुम्ही करा. माझं लेकरू मी तुमच्या ताब्यात दिलं आहे.’ कारण, मी इथे काहीच करू शकत नव्हते.’
Phulwa Khamkar : अनिल बर्वेंची लेक झाली खामकर मसालेवाल्यांची सून, मराठीसह ‘फुलवा’ बॉलिवूडमध्ये गाजली
‘ज्यावेळी ऑक्सिजन लेव्हल कमी झालेली हे माझ्या मुलीला समजलं आणि तिनं मैत्रिणीला अॅम्ब्युलन्स बोलवायला सांगितली. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलेलं की, ती वाचू शकणार नाही. तिच्या मित्र-मंडळींचे आई-वडील मला भेटायला येत होते. मी फक्त स्वामींचं नामस्मरण करत होते. दहा दिवसांनी लंडनहून फोन आला की, ती कोमातून बाहेर आली आहे आणि व्हेन्टीलेटर काढलं आहे.’ असं सविता यांनी शेवटी सांगितलं. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सविता मालपेकर बोलत होत्या. Eva Grover : आमिर खानच्या सावत्र भावासोबत लग्न, नवऱ्यानेच कामासाठी ठेवायला सांगितले निर्मात्यांसोबत संबंध; अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग दरम्यान, सविता मालपेकर यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘काकस्पर्श’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘पांघरूण’, ‘कोकणस्थ’, ‘मुलगी झाली हो’ यांसारख्या मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा