Headlines

Girish Mahajan: ठाकरेसेनेत तुम्ही तिघंच जण राहाल! गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंना टोला – girish mahajan slams uddhav thackeray only 3 people would remain in shiv sena ubt soon


Girish Mahajan On Uddhav Thackeray: कुंभमेळा प्रधिकरण कार्यालयातील सभागृहाचे उद्घाटन महाजन यांच्या हस्ते झाले. यानंतर जिल्हा परिषद जुन्या इमारतीच्या आवारात महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

girish mahajan
गिरीश महाजन(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.खास प्रतिनिधी, नाशिक: उद्धव आणि आदित्य ठाकरेंनी आमच्या बहुमताकडे न बघता तुमचा पक्ष कसा वाचवता येईल, याकडे लक्ष द्यावे. अजून काही लोक फुटण्याच्या मार्गावर असून मागेपुढे पक्षात तुम्ही तीनच लोक राहाल’, असा टोला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी नाशिकमध्ये लगावला.

ते म्हणाले, ‘अडीच वर्षे ठाकरे मुख्यमंत्री राहिले परंतु मंत्रालयात आले नाहीत. त्यांचा पक्ष साफ होत चालला आहे. इतकी वर्ष ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा जप करीत होते. ‘तेव्हाची तुमची भाषणे दाखवू का? आम्ही कुणालाही वाका किंवा झुका असे सांगत नाही. लोकच त्यांना त्यांची जागा दाखवत आहेत. त्यांनी स्वप्ने पाहावीत, पण ती ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ठरतील’, असा टोला मंत्री महाजन यांनी लगावला.

Maharashtra TimesNashik Crime : वैष्णवी आवारे मृत्यू प्रकरण; दुसऱ्यासोबत लग्न जमल्याचा राग, बॉयफ्रेंडला कळताच नको ते केलं, नाशिकमधील घटनेचा उलगडा
दर रविवारी आम्ही शहरात व शहरालगत झाडे लावत आहोत. आजदेखील आठ हजार झाडे लावली असून त्यापैकी काही सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या आवारात लावली. आपल्याकडील बरेचसे सांडपाणी नदीमध्ये जात असून यासाठीच दोन हजार कोटी रुपयांच्या एसटीपी प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. हे काम चार महिन्यांत पूर्ण होईल. पाण्यावर प्रकिया करून त्याला पुन्हा नदीमध्ये सोडणार आहोत. रिंगरोड बाधित १५ ते २० टक्केच शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यासंदर्भात उपोषणकर्ते करण गायकर यांची भेट घेऊन मागण्यांवर निश्चितपणे मार्ग काढू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Maharashtra TimesNashik Fraud: दुप्पट सोन्याचं आमिष, नाशिकच्या माजी महापौरांच्या 200 तोळे दागिन्यांची लूट; सराफानं गंडवलं, प्रकरण काय?
ठाकरे गटाची ‘मानवी साखळी’
नाशिक : सोनम वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणाला शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी शालिमार परिसरात मानवी साखळी करून पाठिंबा दर्शविला. ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीकरीता दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून हे आंदोलन करण्यात आले. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी लांबलचक मानवी साखळी तयार करीत वांगचुक आणि दीपके यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत वांगचुक यांच्या मागण्यांची दखल घ्यावी, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गिते, नगरसेवक तात्या भामरे, सचिन बांडे यांसह पदाधिकारी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले. दरम्यान, मनमाडला शिवसेना ठाकरे गटातर्फे रविवारी सरकारचा निषेध करण्यात आला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा