Headlines

वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी मंदिरांमध्ये त्वरित बसवा सीसीटीव्ही:लासलगावमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांचे आवाहन‎




शहरासह ग्रामीण भागातील मंदिरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लासलगाव पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिरांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. अलीकडील चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंदिरांनी आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे आवाहन यावेळी सागर कोते यांनी केले. बैठकीत मंदिर परिसरात दर्जेदार सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, मंदिरातील सोन्या-चांदीचे दागिने व मौल्यवान वस्तू रात्री सुरक्षित ठिकाणी किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवणे, तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधणे, अशा महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मंदिरांनी सुरक्षारक्षकांची नियुक्ती केल्यास चोरीच्या घटनांना आळा घालण्यास मोठी मदत होईल, असेही कोते यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील सुरक्षाही अधिक सक्षम करण्यासाठी ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात येणार असून, स्थानिक युवकांचा सहभाग घेऊन रात्रीच्या गस्तीवर भर दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. पोलिस व नागरिक यांच्या समन्वयातून सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीस लासलगाव, विंचूर, पिंपळगाव नजीक, कोटमगाव, टाकळी विंचूर तसेच परिसरातील विविध गावांतील मंदिरांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीनंतर मंदिरांच्या सुरक्षेसंदर्भात पोलिस व मंदिर व्यवस्थापन यांच्यात नियमित समन्वय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक मंदिराने आपत्कालीन संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावावेत, तसेच रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन केले .प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. मंदिर परिसरात उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. मंदिरातील सोन्या-चांदीचे दागिने व मौल्यवान वस्तू रात्री सुरक्षित ठिकाणी किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. आर्थिकदृष्ट्या सक्षम मंदिरांनी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी. ग्रामीण भागातील सुरक्षेसाठी ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून रात्रीची गस्त वाढविण्यात येणार आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत