Headlines

भारतीय महिलांचा गोल्डन ‘पंच’, बॉक्सिंगमध्ये प्रीती, जास्मिन, साक्षी, प्रिया, अरुंधतीचे सुवर्णयश


Indian Women Golden Punch : शनिवारची संध्याकाळ भारतीय बॉक्सिंगच्या नावावर राहिली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी दमदार कामगिरी करत अनेक पदके पटकावली. यात महिला बॉक्सरनी तर कमालच केली. त्यांनी एकूण पाच सुवर्णपदके जिंकून भारताचा दबदबा सिद्ध केला.

Commonwealth Games 2026 Gold Medal
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय बॉक्सरनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवार गाजवला. विशेषतः महिला बॉक्सरनी पाच सुवर्णपदकांची कमाई करून आपला ठसा उमटवला. या सुवर्णविजेत्यांत जास्मिन लांबोरिया, प्रीती पवार, साक्षी चौधरी, प्रिया घंघास, अरुंधती चौधरी यांचा समावेश आहे, पुरुषांत सचिन सिवाच, अंकुश पंघल यांनी सुवर्णपदके मिळवली. दरम्यान, लव्हलिना बरगोहाँइ, जादुमणीसिंग यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

जगज्जेत्या जास्मिनने महिलांच्या ५७ किलो गटात गतविजेत्या मायकेला वॉल्शला ५-० असे पराभूत केले. जास्मिनने गेल्या २०२२ मधी ‘राष्ट्रकुल’मध्ये ब्राँझपदक मिळवले होते. प्रीतीने महिलांच्या ५४ किलो गटात कॅनडाच्या स्कार्लेट डेल्गाडोवर ५-० असा एकतर्फी विजय मिळवला. महिलांच्या ५१ किलो गटात साक्षी चौधरी, प्रिया घंघास, अरुंधती चौधरी यांचा समावेश आहे, पुरुषांत सचिन सिवाच, अंकुश पंघल यांनी सुवर्णपदके मिळवली. दरम्यान, लव्हलिना बरगोहाँइ, जादुमणीसिंग यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
Maharashtra TimesPriya Ghanghas Gold : जय हो! कॅनडाच्या बॉक्सरची धुळधाण उडवत प्रियाने जिंकलं सुवर्णपदक; भारताच्या खात्यात बॉक्सिंगमधील चौथं गोल्ड
जगज्जेत्या जास्मिनने महिलांच्या ५७ किलो गटात गतविजेत्या मायकेला वॉल्शला ५-० असे पराभूत केले. जास्मिनने गेल्या २०२२मधील ‘राष्ट्रकुल’मध्ये ब्राँझपदक मिळवले होते. प्रीतीने महिलांच्या ५४ किलो गटात कॅनडाच्या स्कार्लेट डेल्गाडोवर ५-० असा एकतफी विजय मिळवला. महिलांच्या ५१ किलो गटात साक्षी चौधरीने इंग्लंडच्या रुबी व्हाइटला ५-० असे पराभूत करून सुवर्णपदकावर नाव कोरले, तर ६० किलो गटात प्रिया घंघासने कॅनडाच्या मेरी बाथूल अल अहमदीवर ४-१ अशी मात केली आणि जेतेपद मिळवले. तसेच, ७० किलो गटाच्या अंतिम लढतीत अरुंधती चौधरीने इंग्लंडच्या शाँटल रीडवर ५-० असा विजय मिळवला.
Maharashtra TimesCommonwealth Games 2026 : याला म्हणतात जिद्द! देशसेवेत पाय गमावला, जवान सोमन राणा ‘गोल्ड’न बॉय ठरला, शुभमनेही सिल्व्हर जिंकलं
पुरुषांच्या ६० किलो गटात सचिन सिवाचने नामिबियाच्या ट्रायागेन एन्डेव्हेलोवर ३-२ अशी, तर ८० किलो गटात अंकुश पंघलने इंग्लंडच्या दिमेजी शित्तूवर ४-१ अशी मात केली आणि सुवर्णपदकावर नाव कोरले. पुरुषांच्या ५५ किलो गटात जादुमणीला ऑस्ट्रेलियाच्या डिक्सनकडून ०-५ अशी हार पत्करावी लागली. तसेच, ९०हून अधिक किलो गटात नरेंदरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. इंग्लंडच्या थॉमसकडून त्याला हार पत्करावी लागली

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा