Headlines

सातारा गुन्हेगारी वृत्त:माहुली पुलावर पोलिसांची कारवाई, पिस्तूल-काडतुसांसह तरुण ताब्यात




शस्त्र विक्रीच्या उद्देशाने माहुली परिसरात आलेल्या एका तरुणाला सातारा शहर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. आदेश पांडूरंग बिरामणे (वय 30, रा. दुर्गा सोसायटी, धनकवडी) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. माहुली पुलाजवळ एक तरुण शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात पाळत ठेवली. पुलाजवळ संशयास्पदरीत्या थांबलेल्या बिरामणे याची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे आढळून आली. पिस्तुलावर ‘ऑटो पिस्तल मेड इन यूएसए’ असा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त शस्त्राची किंमत सुमारे 70 हजार रुपये आहे. याप्रकरणी हवालदार सुहास कदम यांनी फिर्याद दिली आहे. सहायक निरीक्षक बिले तपास करीत आहेत. कोडोलीत चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घरातून सोन्या-चांदीचे दागिने चोरीला घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. कोडोली येथील दत्तनगर परिसरात ही घटना घडली. इंताज अल्ताब पटेल यांच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर लाकडी कपाट उचकटण्यात आले. त्यातून सोन्याची गळसर, मंगळसूत्र, सोन्याची साखळी, कानातील टॉप तसेच चांदीचे ब्रेसलेट असा ऐवज चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पटेल यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान भोवले; पॉवर हाउस परिसरातील एकावर पोलिसांची कारवाई सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध कारवाई केली. पॉवर हाउस परिसरातील मोकळ्या मैदानात शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. संतोष चंद्रकांत कुऱ्हाडे (वय 38, रा. 996, मंगळवार पेठ, सातारा) असे कारवाई झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोकळ्या मैदानात मद्यसेवन करून सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी कुऱ्हाडे याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार चव्हाण पुढील तपास करीत आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत