Headlines

चोपड्यात बापाचा मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला:12 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, 10 वर्षांचा मुलगा गंभीर, संशयित आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात




जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती येथे खळबळजनक घटना समोर आली आहे. एका पित्याने आपल्याच दोन निष्पाप मुलांवर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात 12 वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाला असून, 10 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हा थरारक प्रकार एका लहान मुलामुळे उघडकीस आला. गावकरी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक लहान मुलगा 10 वर्षांच्या रामूला गोट्या खेळण्यासाठी घरी बोलवायला गेला होता. त्यावेळी रामू घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्याला दिसला. लहान मुलाने तात्काळ या घटनेची माहिती गावातील इतर लोकांना दिली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. 8 दिवसांपूर्वीच कारागृहातून आला होता बाहेर सुभाष भिलाला असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो अवघ्या आठ दिवसांपूर्वीच कारागृहातून सुटून आला होता. कारागृहातून परतल्यानंतर त्याने आपल्याच वडती गावातील राहत्या घरी निष्पाप मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच चोपडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून संशयित आरोपी सुभाष भिलाला याला ताब्यात घेतले आहे. गंभीर जखमी मुलावर उपचार सुरू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 10 वर्षांच्या बालकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच चोपडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत हा प्रकार घडल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हे ही वृत्त वाचा

‘मला तुझी गरज नाही’ या टोमण्यांमुळे मुलाची हत्या:आईने हौदात बुडवून मारले, अपघात दाखवण्यासाठी खुर्ची ठेवली, माहेरी पळून गेली
मला आता तुझी गरज नाही, माझा वंश पुढे नेण्यासाठी मुलगा आणि मुलगी आहेत. हरियाणातील सोनीपतच्या मुंडलाना गावात हेच दोन वर्षांच्या चिमुकल्या चिरांशच्या हत्येचे कारण बनले. पत्नीने पतीशी सूड घेण्यासाठी स्वतःच्या मुलाला पाण्याच्या हौदात बुडवून मारले. 29 जुलै रोजी घडलेली ही घटना सुरुवातीला अपघात मानली गेली. आरोपी प्रियानेही हा अपघात असल्याचे सिद्ध करण्यासाठी पूर्ण कहाणी रचली, हौदाजवळ खुर्ची ठेवली, दुधाची बाटली पाण्यात सोडली, सुसाइड नोट लिहून घरातून निघाली आणि थेट माहेरी पोहोचली, पण पोलीस तपासात तिने रचलेली कहाणी एक-एक करून उघडकीस आली. हौदात कमी पाणी, घटनेच्या वेळी तिचे घरातून गायब असणे, सीसीटीव्ही फुटेज आणि चौकशीत समोर आलेल्या तथ्यांनी संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. दोन दिवसांपूर्वीच कुटुंबाने चिरांशचा वाढदिवस साजरा केला होता. वाचा सविस्तर



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत