Jasmine Lamboria Gold News : काही आठवड्यांपूर्वीच हॉस्पिटलच्या बेडवर आजाराशी लढणाऱ्या जास्मिन लांबोरियाने राष्ट्रकुलमध्ये आपल्या जिद्दीने सर्वांना थक्क केले. भिवानीच्या २४ वर्षीय या बॉक्सरसमोर राष्ट्रकुलमध्ये खेळण्याबत मोठा प्रश्नचिन्ह होता. पण तिने हार मानली नाही आणि सुवर्णपदक नावावर केले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ग्लासगो : काही आठवड्यांपूर्वी हॉस्पिटलमध्ये आजाराशी झुंज देणारी… ‘राष्ट्रकुल’ मधील सहभागाबाबत अनिश्चिततेच्या गर्तेत सापडलेल्या जास्मिन लांबोरियाने संस्मरणीय कामगिरी केली. तिने जिद्दीच्या जोरावर सुवर्णयश मिळवले. भिवानीच्या २४ वर्षीय जास्मिनने झुंजार कामगिरी केली. मार्चमधील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेपासून तिच्या अडचणी वाढल्या होत्या. खूप ताप असतानाही तिने स्पर्धेतून माघार घेतली नाही. झुंज देऊन अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आणि रौप्यपदक मिळवले. यासह ती ‘राष्ट्रकुल’ साठी पात्र ठरली.
जास्मिन म्हणाली, ‘माझ्या पहिल्या लढतीनंतर खूप ताप आला होता. माझी प्रकृती खूप खराब होती. कशीबशी मी उपांत्य फेरी गाठली. त्या लढतीत कडवी झुंज देऊन बाजी मारली. त्या लढतींत मी सर्वस्व पणाला लावले होते.’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिच्या डोक्याला मार लागला होता. सुदैवाने वैद्यकीय अहवाल सामान्य आले होते. हा वाईट काळ मागे पडला, असे तिला वाटत होते. मात्र, पुन्हा एकदा ती आजारी पडली. ‘मी भारतात परतल्यानंतर २० दिवस सरावही केला. मात्र, पुन्हा एकदा आजारी पडले. पुन्हा मी तापाने फणफणले होते. खूप औषधे घ्यावी लागत होती. मला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हा आजार नेमका काय आहे, हे मला माहीत नाही. सर्व काही ठीक असावे आणि लवकर बरी होईल, अशी आशा आहे,’ असे जास्मिनने त्या वेळी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले होते. Commonwealth Games 2026 : भारतीय महिलांचा गोल्डन ‘पंच’, बॉक्सिंगमध्ये प्रीती, जास्मिन, साक्षी, प्रिया, अरुंधतीचे सुवर्णयश या आजारपणामुळे ती जूनमध्ये चेक प्रजासत्ताकमधील भारताच्या सराव शिबिराला मुकली होती. त्यामुळे तिच्या ‘राष्ट्रकुल’ साठीच्या तयारीला मोठा धक्का बसला होता. यामुळे तिच्या मानसिकतेवरही परिणाम होत होता. मात्र, क्रीडा मानसशास्त्रज्ञामुळे आत्मविश्वास पुन्हा वाढला. ती म्हणाली, ‘माझ्या मनात अनेक नकारात्मक विचार आले होते. मात्र, क्रीडा मानसशास्त्रज्ञाने मला प्रेरित केले.’ Priya Ghanghas Gold : जय हो! कॅनडाच्या बॉक्सरची धुळधाण उडवत प्रियाने जिंकलं सुवर्णपदक; भारताच्या खात्यात बॉक्सिंगमधील चौथं गोल्ड जास्मिनने एक जुलैपासून पुन्हा सराव सुरू केला. अर्थात, ‘राष्ट्रकुल’ला एक महिन्याहून कमी कालावधी असताना तिने सराव सुरू केला. ती म्हणाली, ‘प्रशिक्षकांनी मला प्रोत्साहन दिले, तंदुरुस्त राहा, निकालाची चिंता करू नकोस, आत्मविश्वास कायम ठेव, असा सल्ला प्रशिक्षकांनी दिला.’ गेल्या ‘राष्ट्रकुल’मध्ये तिने ब्राँझ जिंकले होते. या वेळीही तिच्याकडून मोठी अपेक्षा होती. अपेक्षांचे ओझे आणि तयारीत आलेल्या विघ्नांनंतरही जास्मिनने मिळवलेल्या सुवर्णयशाची बातच काही और आहे. ती म्हणाली, ‘मी खूप आनंदी आहे. माझ्या पदकाचा रंग बदलण्याच्या आणि भारताच्या सुवर्णपदक जिंकण्याच्या ध्येयानेच मी येथे आले होते.’
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा