Headlines

Peru Nazca Lines Plane Crashes due to Technical Failure Two Pilots and 11 Tourists Died; भीषण विमान अपघात! सहलीला जाताना हवेतच तांत्रिक बिघाड, पर्यटनाचा आनंद घेताना प्लेन कोसळलं; दोन पायलटसह 13 पर्यटकांचा करुण अंत


Peru Tourist Plane Crash Near Nazca Lines 13 Deaths : पेरूमधील नाझ्का शहराजवळ नाझ्का लाईन्सला पर्यटकांना घेऊन जाणारे एक छोटे विमान कोसळले. या अपघातात विमानातील 11 पर्यटक आणि दोन वैमानिकांसह 13 जणांचा मृत्यू झाला. हे विमान युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ असलेल्या नाझ्का लाईन्सवरून जात होते. नेमका अपघात कसा झाला? याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Peru Tourist Plane Crash Near Nazca Lines 13 Deaths
पेरु नाझ्का लाईन विमान अपघात(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पेरु : दक्षिण अमेरिकेतील पेरू देशात एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. प्रसिद्ध पर्यटनाचं केंद्र असलेल्या ‘नाझ्का लाईन्स’ परिसरात पर्यटकांना घेऊन जाणारं एक छोटं विमान कोसळल्याने विमानातील 13 जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये परदेशी पर्यटकांसह विमानातील दोन वैमानिकांचा समावेश आहे. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे हे विमान थेट जमिनीवर कोसळलं आणि त्याला भीषण आग लागली.

नेमका कसा झाला अपघात?

काल शनिवारी पेरू देशातील नाझ्का शहराजवळ एका शेतात पर्यटक विमान कोसळल्यानं 13 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. TOI च्या वृत्तानुसार, मृतांमध्ये पायलट, को पायलटसह 11 प्रवाशांचा समावेश आहे. इका प्रदेशातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या नाझ्का लाइन्सवरून हवाई सफर करत असताना हे विमान कोसळलं. त्या भागात अचानक वादळ आल्याच्या दुसऱ्या दिवशी हा अपघात घडला.
Maharashtra TimesNirmal Purja Dies: जगप्रसिद्ध गिर्यारोहकाचा पाकिस्तानात करुण अंत; ब्रॉड पीकवर चढाई करताना झालेले बेपत्ता
नाझ्का अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे विमानाने जवळच्या इका शहरातून उड्डाण भरलं होतं. ते पेरूच्या एरोडियाना या विमान कंपनीद्वारे चालवलं जात होतं. एअरलाइनच्या वेबसाइटनुसार, ही कंपनी गेल्या 14 वर्षांपासून सेसना ग्रँड कॅराव्हॅन विमानांचा वापर करून नाझ्का लाइन्सवरून निसर्गरम्य हवाई सफरी आयोजित करत आहे. स्थानिक मिडिया रिपोर्ट्सनुसार, विमानाने उड्डाण घेत ते नाझ्का विमानतळाजवळ पोहोचत असताना त्याचा संपर्क तुटला. पेरूच्या व्यापार आणि पर्यटन मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे की, ‘काल शनिवारी कोसळलेल्या विमानात 11 परदेशी पर्यटक आणि दोन कर्मचारी होते. सरकारी वृत्तसंस्था एजन्सिया अँडिनाने दिलेल्या वृत्तानुसार, विमानात दोन जर्मन, दोन स्पॅनिश आणि सात इटालियन पर्यटक होते.

नाझ्का रेषा काय आहेत?

नाझ्का रेषा जगातील सर्वात रहस्यमय पुरातत्व स्थळांपैकी एक मानल्या जातात. ही प्रचंड छायाचित्रे शेकडो वर्षांपूर्वी पेरूच्या वाळवंटात स्थानिक आदिवासी समुदायांनी वरची माती काढून तयार केली होती. यामध्ये पक्षी, माकडं, कोळी आणि असंख्य भौमितिक आकारांच्या मोठ्या प्रतिमांचा समावेश आहे, ज्या केवळ आकाशातूनच पूर्णपणे दिसू शकतात. अनेक लोक तर त्यांचा संबंध परग्रहवासीयांशी जोडतात. या अद्वितीय वैशिष्ट्यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक लहान विमानांमधून ही चित्रे आकाशातून पाहण्यासाठी आकर्षित होतात. या स्थळाचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतही आहे.
Maharashtra TimesSpain Ceuta Migration: काही जण बुडाले, अनेक जण चेंगराचेंगरीत दबले! 57 जणांचा वेदनादायी अंत, एका स्वप्नानं जीव घेतला
नाझ्का लाईन्सवरून जाणाऱ्या पर्यटक विमानांचा हा पहिला मोठा अपघात नाही. 2022 मध्ये, एक पर्यटक विमान कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता. 2010 मध्ये झालेल्या आणखी एका विमान अपघातात सहा जणांचा बळी गेला होता. अपघातांच्या या मालिकेमुळे या पर्यटक विमानांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा