Pimpri Chinchwad Two Workers Die in Chamber : गेल्या वर्षीही याच परिसरात अशाचप्रकारे चेंबरमध्ये अडकून दोघांचा जीव गेला असताना, पुन्हा तशाच घटनेची पुनरावृत्ती झाल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

12 वाजेच्या सुमारास दोघे अडकले
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास हे दोन्ही कामगार चेंबरमध्ये अडकल्याची माहिती पोलिसांना आणि अग्निशमन दलाला मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चेंबरमध्ये अडकलेल्या दोन्ही कामगारांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले.
मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट
अथक प्रयत्नांनंतर दोन्ही कामगारांना चेंबरमधून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केलं. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवले आहेत. दरम्यान, या कामगारांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चेंबरमध्ये विषारी वायू किंवा ऑक्सिजनची कमतरता यांसारख्या कारणांची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
गेल्यावर्षी तिघांचा मृत्यू
विशेष म्हणजे, गेल्यावर्षी याच परिसरात चेंबरमध्ये अडकून तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही पुन्हा अशाच प्रकारची दुर्घटना घडल्यानं प्रशासनानं या धोकादायक चेंबरबाबत योग्य ती खबरदारी घेतली होती का? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. वारंवार अशा दुर्घटना घडत असतानाही संबंधित यंत्रणांकडून सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कुलूप तोडताच पायाखालची जमीन सरकली!
तीस वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पालघर शहरातील जुना सातपाटी रोड परिसरातील एका इमारतीच्या सदनिकेत आढळला आहे. पूजा मिश्रा (वय ३०) असे या मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा मिश्रा आणि त्यांचे पती चंदन मिश्रा या दोघांचे लग्न सहा वर्षांपूर्वी झाले होते. मिश्रा दाम्पत्य पालघर शहरातील जुना सातपाटी रोड परिसरातील घोडेला गार्डन परिसरातील फनेल या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सदनिका क्रमांक २०१ मध्ये येथे वास्तव्यास होते. पूजाचे भाऊ प्रदीप कुमार मिश्रा बहिणीला शनिवारी रात्री आठ वाजल्यापासून सातत्याने फोन करत होते. मात्र पूजा यांनी फोन उचलला नाही, त्यानंतर काही वेळाने त्यांचा फोन बंद येऊ लागला.
घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी
दोन दिवस सतत संपर्क करण्याचा प्रयत्न पूजाचे भाऊ प्रदीप यांनी केला. मात्र कोणताही संपर्क होऊ शकला नाही. आपल्या बहिणीसोबत नेमके काय झाले, या चिंतेत असलेले भाऊ प्रदीप सोमवारी थेट सुरत येथून बहिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी दाखल झाले. बहीण वास्तव्य करत असलेल्या इमारतीच्या सदनिकेबाहेर प्रदीप मिश्रा पोहोचले असता सदनिकेच्या दरवाज्याला कुलूप असल्याचे व दरवाजा बंद असल्याचे आढळून आले. सदनिकेच्या आतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याचे देखील त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने 112 नंबरवर फोन करून पोलिसांशी संपर्क साधला, त्यानंतर पोलीस कर्मचारी प्रविण पाटील आणि राजेश वायझडे यांच्यासह पालघर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले.

