Headlines

Kanda Express: एक्स्प्रेसमधून कांदा, गोंधळाने वांधा; 840 टनाऐवजी 500 टन कांदा लोड, विलंबामुळे दंड – 500 tonnes of onions loaded onto onion express instead of 840 tonnes


Kanda Express: शेतकरी संघटनांचा आरोप, आहे की एनसीसीएफने शेतकऱ्यांकडून कांदा १२०० ते १४०० रुपये क्विंटल दराने खरेदी करून महानगरांत ३० रुपये किलो दराने विक्रीची तयारी केली असून यातून नफा कमावला जात आहे.

Anderson Phillip Catch - 2026-08-27T150904
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, निफाड: दिल्लीसह महानगरांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी ‘एनसीसीएफ’तर्फे लासलगाव रेल्वे स्थानकातून दिल्लीच्या आदर्शनगर बाजारपेठेसाठी विशेष रेल्वेने कांदा पाठविण्यात आला. मात्र, ८४० टनांच्या ऑर्डरपैकी केवळ सुमारे ५०० टन कांदा लोड झाल्याची माहिती आहे.

मंगळवारी सायंकाळी सुरू झालेले लोडिंग संथ गतीने सुरू राहिले. प्रतवारी व पॅकिंग वेळेत न झाल्याने कांदा एक्स्प्रेस निर्धारित वेळेपेक्षा सुमारे ३२ तास उशिराने, बुधवारी दुपारी ३.१० वाजता दिल्लीकडे रवाना झाली. या विलंबामुळे प्रतिबोगी प्रतितास १५० रुपये दंडाप्रमाणे सुमारे एक लाख रुपयांचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे.

Maharashtra TimesNashik News: पासष्ट लाखांचा आठ वर्षांत अपहार; नाशिक महापालिकेच्या घरपट्टी वसुलीत सावळा गोंधळदरम्यान, प्रहार संघटनेचे अध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी ही रेल्वे अडवली. लोड केलेला कांदा नाशिक जिल्ह्यातील नसून सडलेला असल्याचा आरोप त्यांनी केला. हा कांदा कोणत्या शेतकऱ्यांकडून व कोणत्या एजन्सीमार्फत खरेदी केला, याची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली. निंबाळकर रेल्वे रुळांवर उतरल्याने रेल्वे पोलिस व लासलगाव पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सुमारे दीड तासाच्या गोंधळानंतर कांदा एक्स्प्रेस रवाना झाली.

“आमच्या शेतकऱ्यांचा कांदा शिल्लक असताना एनसीसीएफ सडलेला कांदा दिल्लीला पाठवत आहे. याचा परिणाम बाजारभावावर होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते,” असा आरोप निंबाळकर यांनी केला.

Maharashtra TimesNashik Crime : गर्लफ्रेण्ड रुसली, 27 वर्षांच्या आदित्यने थेट चौकातच ‘सॉरी’चा बॅनर लावला, लोकांमध्ये चर्चा, पोलिसांकडून ‘पंचनामा’विलंबामागची तीन कारणे

लोडिंग संथ गतीने : मंगळवारी सायंकाळी सुरू झालेले कांदा लोडिंग रात्रीपर्यंत सुरू राहिले; गती कमी असल्याने ट्रेन वेळेत भरली नाही

प्रतवारी व पॅकिंगला विलंब : कांद्याची प्रतवारी आणि पॅकिंग पूर्ण न झाल्याने ८४० टन ऑर्डर असूनही केवळ सुमारे ५०० टन कांदा लोड होऊ शकला

आंदोलनामुळे अडथळा : प्रहार संघटनेने कांद्याचा दर्जा व खरेदीतील पारदर्शकतेवर आक्षेप घेत ट्रेन अडवली. त्यामुळे रवाना होण्यास आणखी विलंब

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा