UK Social Media Ban: सोळा वर्षांखालील मुलांना ब्रिटनमध्येही ‘सोशल’बंदी; अॅप वापरावर निर्बंधाची पंतप्रधान स्टार्मर यांची घोषणा – britain pm keir starmer announced sweeping ban on social media access for childrens under age 16
वृत्तसंस्था, लंडन : ‘सोळा वर्षांखालील सर्व मुलांचा आनंद आणि सुरक्षिततेसाठी सोशल मीडिया ॲप वापरण्यास बंदी घालण्यात येईल,’ असे ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टार्मर यांनी सोमवारी जाहीर केले. पंतप्रधान आणि लहान मुलांचे वडील या नात्याने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. ‘जगातील काही सर्वांत शक्तिशाली तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश असलेल्या सोशल मीडियाच्या वापरावर अशी बंदी लादणे सोपे नाही,’…
