INDvsENG Vaibhav Sooryavanshi : भारत आणि इंग्लंडमधील टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. ही मालिका इंग्लंडमध्ये पार पडली जाणार असून वैभव सूर्यवंशीला खेळवणार का हा प्रश्न सर्वांना पडला आहे. दोन्ही संघांमधील रेकॉर्ड जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे. आयर्लंडविरूद्ध लागलेला पराभवाचा डाग पुसून काढण्याचा भारतीय संघ पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल. कारण वर्ल्ड कप विजेत्या भारताला दुबळ्या आयर्लंडने २-० ने व्हाईटवॉश दिला. हा पराभव सर्व भारतीयांच्या जिव्हारी लागला, याचं कारण म्हणजे आतापर्यंत आयर्लंड संघाने एकदाही भारताला हरवले नव्हते. पहिल्यांदाच कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या श्रेयस अय्यरला आपल्या नेतृत्त्वात अपयश पदरी आलं होतं. परंतु आता इंग्लंड दौऱ्यावर दमदार कमबॅक करण्याची संधी त्याच्यासह संघालाही आहे. आजच्या सामन्यामध्येही बेबी बॉस म्हणजेच वैभव सूर्यवंशी याला संधी देतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भारत आणि इंग्लंडमधील हेड टू हेड रेकॉर्ड पाहिले तर दोन्ही संघांमध्ये ३० सामने झाले असून त्यामधील १८ सामन्यांत भारत आणि १२ सामन्यांमध्ये इंग्लंड विजयी ठरला आहे. आकडेवारी पाहता भारतीय संघाचे पारडे जड वाटत आहे. मात्र आता ही मालिका इंग्लंडच्या घरच्या मैदानावर पार पडत असल्याने भारतासमोर तगडे आव्हान असणार आहे. आता पार पडलेल्या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंडचा संघ आमनेसामने आला होता, त्यावेळी भारताने ७ धावांनी तो सामना जिंकला होता. २०१८ नंतर इंग्लंड आणि भारतामध्ये झालेल्या सर्व टी-२० मालिका भारताने जिंकल्या आहेत.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा