Headlines

Bank Holidays July 2026: जुलैमध्ये 12 दिवस बँकांचे कामकाज बंद पडणार; सुट्ट्यांची यादीच पाहूनच कामाचे प्लॅनिंग करा


RBI July 2026 Bank Holidays in India: आरबीआयने राज्यातील सण, रविवार आणि शनिवार यांना जोडून असलेली जुलै 2026 मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. मात्र, बँक हॉलिडेच्या दिवशी नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय आणि एटीएम यांसारख्या डिजिटल सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील जेणेकरून ग्राहकांना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये.

Bank Holiday List July 2026
जुलैमध्ये 12 दिवस बँकांना सुट्टी(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Bank Holiday 2026: बँकिंग क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी जुलै 2026 चा महिना आव्हानात्मक ठरू शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच जारी केलेल्या हॉलिडे यादीनुसार जुलै महिन्यात विविध राज्यांमधील बँका तब्बल 12 दिवस बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये साप्ताहिक सुट्ट्या म्हणजे रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार) तसेच अनेक प्रादेशिक सण आणि विशेष प्रसंगांचा समावेश आहे.

पण या सुट्ट्या देशभरात एकाच दिवशी लागू होत नाही तर, काही सुट्ट्या केवळ राज्यांमध्ये किंवा शहरांमध्येच लागू असतात. त्यामुळे, ग्राहकांनी आपल्या शहरासाठी सुट्ट्यांची यादी पाहूनच आपल्या बँकेच्या शाखेला भेट द्यावी.
Maharashtra Times8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाच्या हालचाली अंतिम टप्प्यात; पगारवाढीत सरकारच अडसर ठरणार? फिटमेंट फॅक्टरबाबत मोठे संकेत

बँका बंदमुळे ग्राहकांची गैरसोय नाही होणार

आरबीआयच्या बँक हॉलिडेमसूर जुलै महिन्यात अनेक राज्यांमध्ये काही महत्त्वाच्या तारखांना बँकांचे कामकाज बंद राहील. पण ग्राहकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय आणि एटीएम यांसारख्या डिजिटल सेवा सुरूच राहतील. त्यामुळे, ग्राहकांनी चेक जमा करणे, रोख व्यवहार किंवा इतर महत्त्वाची कामे, ज्यासाठी शाखेला भेट देणे गरजेचे आहे, आगाऊ पूर्ण करून घेणे शहाणपणाचे ठरेल.
Maharashtra TimesVolkswagen Layoffs: ऑडी, पोर्शे कार उत्पादक कंपनीत महाभूकंप, 1 लाख कर्मचाऱ्यांचे जॉब धोक्यात; कारखान्यांनाही टाळं लागणार?

जुलैमध्ये बँकांना कधी, केव्हा सुट्टी?

जुलै 2026 मध्ये संपूर्ण महिन्यात चार रविवार म्हणजे 5, 12, 19 आणि 26 जुलै रोजी बँका बंद असतील. तसेच 11 जुलै रोजी दुसरा शनिवार आणि 25 रोजी चौथ्या शनिवारी देखील बँकांच्या शाखांमध्ये कामकाज बंद राहील. याव्यतिरिक्त काही राज्यांमध्ये सण आणि विशेष प्रसंगांसाठी अतिरिक्त सुट्ट्या असतील.
Maharashtra TimesITR भरला तरी टेन्शन! 30 जूनपर्यंत येऊ शकते Tax Notice, जाणून घ्या कारण; ऑनलाईन उत्तर देण्याची सोपी प्रोसेस
अनेक राज्यांमध्ये 6 जुलै रोजी मुहर्रम (आशुरा) निमित्त बँका बंद राहतील तर, मेघालयामध्ये 9 जुलै रोजी बेह दिंकलाम, ओडिशा आणि मणिपूरमध्ये 16 जुलै रोजी रथयात्रा, मेघालयामध्ये 17 जुलै रोजी यू तिरोट सिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि त्रिपुरामध्ये 22 जुलै रोजी खर्ची पूजेसाठी बँकांचे कामकाज बंद राहील. अशाप्रकारे, रिझर्व्ह अबंकेच्या लिस्टनुसार महाराष्ट्रात संपूर्ण जुलै महिन्यात कोणत्याही अतिरिक्त सुट्टीशिवाय बँकांचे कामकाज सुरू राहील आणि ग्राहकांची कोणतीही गैरसोय होणार नाही.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा