Headlines

Kayadu Lohar : ‘माझा संयम सुटला’, शाळकरी वयात छेड काढणाऱ्या गुंडांना अभिनेत्रीनं शिकवलेला धडा, सांगितला प्रसंग


Kayadu Lohar : दाक्षिणात्य अभिनेत्री कयादू लोहार शाळेत असताना काही गुंडांनी तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अभिनेत्रीनं त्यांना चांगलाच धडा शिकवलेला.

Kayadu Lohar Once Hit Harasser
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – दक्षिणात्य अभिनेत्री कयादू लोहारनं मोजक्याच काही सिनेमांमध्ये काम करून प्रसिद्धी मिळवली. अभिनेत्रीनं केवळ आठ सिनेमांमध्ये काम केलं असलं तरी ती एक स्टार म्हणून ओळखली जाते. अशातच आता एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीनं तिच्या जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. कयादू शाळेत शिकत असताना तिनं रस्त्यावर त्रास देणाऱ्यांना चांगलंच धडा शिकवला होता. याबद्दलही अभिनेत्रीनं सांगितलं आहे.

कयादू लोहारनं सांगितला प्रसंग

‘गलाट्टा तामिळ’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कयादू म्हणाली की, ‘मी शाळेत असताना माझ्या घराशेजारी दहावीच्या ट्यूशनला जायचे. रस्त्यावर काही मुलं मला पाहून इशारे करून छेड काढायचे. पहिल्या दिवशी मी विचार केला, ठीक आहे, जाऊदे. दुसऱ्या दिवशीही मी तसंच दुर्लक्ष केलं. पण तिसऱ्या दिवशी मात्र राग अनावर झाला. मला ते अजिबात सहन झालं नाही आणि माझा संयम सुटला.’
Maharashtra TimesNakul Ghanekar : ‘मी खूप बारीक होतो, लोक मला चिडवायचे म्हणून कथ्थक शिकणं सोडलेलं’, ‘ठरलं तर मग’ फेम नकुल घाणेकरनं सांगितला किस्सा
‘मला प्रचंड राग आला. मी तिथला एक दगड उचलला आणि त्यांना फेकून मारला. त्यापैकी एकाला तो दगड लागला आणि त्याचं डोकं फुटलं. त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं आणि मी तिथून निघून गेले. त्यानंतर पुढे काय झालं मला माहित नाही, पण, ते गुंड होते. मला नाही वाटत की, तुम्ही सहज दगड उचलून कोणाचं डोकं फोडू शकता. पण त्या वेळी मला जे योग्य वाटलं, तेच मी केलं. मी दिसायला कदाचित शांत वाटत असेल, पण जेव्हा कोणी चुकीचं वागतं, तेव्हा मी अजिबात शांत राहत नाही, जशास तसं उत्तर दिलंच पाहिजे, असं मला वाटतं.’ असं कयादूनं पुढे सांगितलं.
Maharashtra TimesZeenat Aman : 15 वर्षांच्या दुःखी वैवाहिक आयुष्यापेक्षा 5 वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिलेलं चांगलं; नव्या पिढीला झीनत अमान यांचा सल्ला
दरम्यान, कयादू लोहारच्या कामाबद्दल सांगायचं तर ती ‘हृदयन मुरली’ आणि ‘इमॉर्टल’ या सिनेमांमध्ये दिसणार असून ‘हृदयन मुरली’ हा सिनेमा १० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच ‘इमॉर्टल’ हा सिनेमा २३ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. इतकंच नव्हे तर अभिनेत्री सलमानच्या ‘आय अॅ गेम’, पृथ्वीराज सुकुमारनच्या ‘खलिफा’ या सिनेमांमध्येही झळकणार आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा