Headlines

Nepal Floods: शाळा जमीनदोस्त, आशा उद्ध्वस्त; पूर गिळायला आला, पोरानं धाडस दाखवलं, चमत्कारिकपणे मृत्यूला चकवलं


नेपाळमध्ये आलेल्या पुरात आतापर्यंत ६०० पेक्षा अधिक जणांनी जीव गमावला आहे. भीषण पुरातून८ वर्षांचा एक मुलगा अगदी चमत्कारिकपणे वाचला आहे.

boy survived nepal
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
काठमांडू: नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरातील मृतांचा आकडा ६०० च्या पुढे गेला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. तर दुसरीकडे आईपासून दुरावलेला ८ वर्षांचा जोयल घाले मृत्यूला चकवा देऊन सुरक्षित परतला. शुक्रवारी त्याला त्याची आई भेटली आणि चिमुकल्या जोयलनं तिला घट्ट मिठी मारली. त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू तरळले. जोयल आणि त्याचा भाऊ शाळेत असताना पुराच्या कचाट्यात सापडले, असं त्यांच्या आईला वाटत होतं.

आठ वर्षांचा जोयल घाले नेपाळमध्ये आलेल्या पुरातून स्वत:ला वाचवण्यासाठी जंगलात पळाला. एका झाडावर चढून त्यानं स्वत:चा जीव वाचवला. शुक्रवारी जोयलला पुराचा फटका बसलेल्या रसुवा जिल्ह्यातून एअरलिफ्ट करण्यात आलं. त्याच्या पायाला आणि चेहऱ्याला जखम झाली आहे. जोयलची आई लेकरांच्या शोधात मदतीसाठी उभारण्यात आलेल्या विविध शिबिरांमध्ये भटकत होती.

बुधवारी २६ ऑगस्टच्या सकाळी जोयल आणि त्याचा भाऊ गाडीनं शाळेत गेले. त्यावेळी त्यांची आई घरी शिलाईचं काम करत होती. तेव्हा तिला अचानक भूकंपासारखा आवाज आला. त्यानंतर परिसरात पाणी शिरलं. त्याच्या सोबत बराच ढिगारा वाहून आला होता. लांगटांग लिरुंग पर्वताजवळ असलेल्या हिमकड्याचा तुकडा कोसळला. त्यामुळे बर्फ, डोंगराचा भाग आणि ढिगारा पाण्यासोबत वाहून आल्याचं सांगण्यात आलं.

मुलांच्या शोधात त्यांची आई (मट्टी माया) त्यांच्या शाळेत गेली. तेव्हा तिला धक्काच बसला. शाळेची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. ती वास्तू ओळखताही येत नव्हती. त्यांनी बरेच दिवस लेकरांचा शोध घेतला. पण त्यांचा ठावठिकाणा सापडला नाही. त्यामुळे माया यांच्या आशा मावळू लागल्या.

याच सुमारास त्यांचा रॉयटर्सच्या पत्रकाराशी संवाद झाला. त्या पत्रकारानं माया यांचा लेक घालेशी संवाद साधला होता. त्यामुळे मट्टी माया यांना आशेचा किरण दिसला. शुक्रवारी त्यांनी फोनवरून आपल्या लेकाशी संवाद साधला. मग माया त्यांना भेटायला काठमांडूच्या रुग्णालयात भेटायला गेली. घालेचं कुटुंब सुदैवी ठरलं. या भीषण संकटातून हे कुटुंब वाचलं.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा