Headlines

दाऊदचा व्याही कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडला! इम्रान खान यांची अवस्था पाहून अश्रू अनावर, पाकिस्तान सरकारकडे काय केली मागणी?


Javed Miandad, Imran Khan News : इमरान खानच्या तुरुंगातील परिस्थितीवर बोलताना जावेद मियांदाद हे कॅमेऱ्यासमोर भावूक झाले. इमरानच्या प्रामाणिकपणाची शपथ घेत त्याने पाकिस्तान सरकारकडे एक मोठी विनंतीवजा मागणी केली आहे.

javed miandad imran khan
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : पाकिस्तानचे माजी दिग्गज फलंदाज जावेद मियांदाद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी कारण क्रिकेटमधील कोणताही वाद नाही. पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि १९९२च्या विश्वचषक विजेत्या संघाचे नेतृत्व करणारे इमरान खान यांच्या तुरुंगातील परिस्थितीवर बोलताना मियांदाद कॅमेऱ्यासमोर भावूक झाले. इमरान यांच्या प्रामाणिकपणाची शपथ घेत त्याने पाकिस्तान सरकारला त्यांच्या सुटकेची भावनिक विनंती केली. मियांदादच्या या वक्तव्यानंतर त्यांचे दाऊद इब्राहिमसोबतचे कौटुंबिक नाते आणि त्याने यापूर्वी केलेली वक्तव्येही पुन्हा चर्चेत आली आहेत.

इमरानसाठी मियांदाद भावूक

एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मियांदाद यांनी इमरान खान यांच्या तुरुंगातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटलं की, ते इमरानला अनेक वर्षांपासून ओळखतात आणि त्यांच्या प्रामाणिकपणावर त्याचा पूर्ण विश्वास आहे. “तो एक प्रामाणिक माणूस आहे. त्याने भ्रष्टाचार केला असता तर आतापर्यंत त्याने खूप काही कमावले असते. त्याला बाहेर येऊ दिलं तर काय होणार आहे? तो कोणाचं नुकसान करणार आहे का? तोही कोणाचा तरी मुलगा आहे,” असे मियांदाद यांनी म्हटलं आहे.

Maharashtra TimesRobin Uthappa : एकविसाव्या वर्षीच 3.2 कोटी रुपये कमावले; पण त्यामुळेच 23व्या मजल्यावरुन उडी मारणार होता रॉबिन उथप्पा, नेमकं काय घडलेलं?
इमरान कोणत्या परिस्थितीत तुरुंगात राहत असेल, याचा विचार करून आपल्याला वाईट वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. क्रिकेट खेळताना दोघांमध्ये मतभेद असले तरी पाकिस्तानला जिंकवणे हेच त्यांचे अंतिम लक्ष्य होते, असेही मियांदाद यांनी स्पष्ट केले.

दाऊद इब्राहिमसोबतच्या नात्यानेही गाजला होता

इमरान यांच्यासाठी भावूक झालेला मियांदाद यापूर्वी दाऊद इब्राहिमसोबतच्या कौटुंबिक नात्यामुळेही चर्चेत आले होते. मियांदादचा मुलगा जुनैद याचा विवाह दाऊद इब्राहिमची मुलगी महरुख हिच्याशी झाला आहे. २०२४ मध्ये एका पाकिस्तानी पत्रकाराच्या यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीत मियांदाद यांनी दाऊदला आपण दुबईच्या काळापासून ओळखत असल्याचे सांगितले होते. आपल्या मुलाचा विवाह दाऊदच्या मुलीशी झाल्याचा आपल्याला अभिमान असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

Maharashtra TimesSuryakumar Yadav First Salary : सूर्यकुमारची पहिली कमाई किती होती माहितीये का? टीम इंडियात कमबॅकसाठी कसा धडपडतोय, काय म्हणाला सूर्यादादा?

इमरान यांच्या कुटुंबीयांनीही व्यक्त केली होती चिंता

इमरान खान यांच्या तुरुंगातील परिस्थितीवर त्यांच्या मुलांनीही यापूर्वी चिंता व्यक्त केली आहे. लॉर्ड्सवर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान इमरानचा मुलगा कासिम याने एका मुलाखतीत आपल्या वडिलांना दिवसातील बहुतांश वेळ एकटं ठेवलं जात असल्याचा आरोप केला होता. तुरुंगात त्यांना इजा करण्याचा प्रयत्न होत असल्याची भीतीही त्याने व्यक्त केली होती. या मुलाखतीच्या प्रसारणावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संबंधित ब्रॉडकास्टरकडे नाराजी व्यक्त केली होती.

क्रिकेटविश्वातील दिग्गजांकडूनही चिंता

दरम्यान, इमरान खान यांच्या आरोग्याबाबत आणि तुरुंगातील परिस्थितीबाबत क्रिकेटविश्वातील काही दिग्गजांनी यापूर्वी चिंता व्यक्त केली आहे. भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि सुनील गावसकर, ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल तसेच पॅट कमिन्स यांच्यासह जगभरातल्या माजी कर्णधारांनी इमरान यांना योग्य वैद्यकीय सुविधा आणि सन्मान मिळावा, अशी मागणी एका पत्रकाद्वारे केली होती.

१९९२च्या विश्वचषकात पाकिस्तानला विजेतेपद मिळवून देताना इमरान खान आणि जावेद मियांदाद यांची भूमिका महत्त्वाची होती. मेलबर्न येथे झालेल्या अंतिम सामन्यात दोघांनी मिळून १३९ धावांची भागीदारी केली होती.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा