Headlines

गोकुळच्या रणांगणात महायुतीचा ‘निर्धार’; धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांच्या ‘समविचारी’ आघाडीवर बोचरी टीका


खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीवर सडकून टीका केली. तसेच गोकुळच्या निवडणुकीत महायुतीचा 25 विरुद्ध शुन्य असा विजय होणार असल्याचा दावा धनंजय महाडिक यांनी केला.

gokul election
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कोल्हापूर : जिल्ह्याचे ग्रामीण अर्थकारण आणि राजकारणाची मुख्य वाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. कोल्हापूरच्या राजकारणात सत्तासंघर्षाचे केंद्रबिंदू ठरणाऱ्या या निवडणुकीबाबत भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे. “यंदा गोकुळची दहीहंडी महायुतीच फोडणार,” असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी समविचारी आघाडीचा पूर्ण पाडाव करत 25 विरुद्ध शून्य असा ऐतिहासिक विजय मिळवण्याचा दावा केला आहे.

गोकुळसाठी महायुतीची वज्रमूठ

गोकुळच्या निवडणुकीत यंदा महायुतीचे सर्व घटक पक्ष निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांचा समावेश आहे. ते एकदिलाने उतरणार असल्याचे खास. महाडिक यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीवर सडकून टीका केली.

“गेल्या निवडणुकीत राज्यात सत्ता असताना त्यांना महाविकास आघाडी आठवली, मग आता समविचारीची गरज का भासतेय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मविआकडे पुरेसे संस्थात्मक ठरावधारक शिल्लक नसल्यामुळेच ते जाणीवपूर्वक महायुतीच्या नेत्यांच्या, जसे की राजवर्धन निंबाळकर आणि आमदार शिवाजीराव पाटील यांच्या भेटी घेत आहेत आणि त्याची प्रसिद्धी करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला

बिनविरोधबाबत महाडिक यांची स्पष्टोक्ती

निवडणूक बिनविरोध करण्याबाबत बोलताना खास. महाडिक यांनी स्पष्ट केले की, महायुतीकडे सध्या मोठी शक्ती आणि ठरावधारकांचा मोठा पाठिंबा आहे, त्यामुळे आम्हाला कोणाकडेही बिनविरोधचा प्रस्ताव घेऊन जाण्याची गरज वाटत नाही. ठरावधारकांना माजी मंत्री महादेवराव महाडिक यांच्या 25 वर्षांच्या कार्यकाळातील शिस्तबद्ध आणि प्रगतीशील कारभाराची आठवण असून, गोकुळमध्ये पुन्हा तसेच ‘रामराज्य’ यावे, अशी त्यांची तीव्र इच्छा असल्याचा दावा खासदार महाडिक यांनी केला.

शक्तिपीठ महामार्गाबाबत ठाम भूमिका

केवळ गोकुळच नव्हे तर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावरही महाडिक यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. शक्तिपीठ महामार्गाला होणारा विरोध लक्षात घेऊनही, जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन आणि दळणवळणाच्या विकासासाठी हा महामार्ग होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बाधीत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून, त्यांच्या अडचणी दूर करून आणि योग्य समन्वय साधून हा प्रकल्प मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Maharashtra TimesPune News : अखेर मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला, तब्बल 17 दिवसांनी आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण मागे, आंदोलकांच्या मागण्या मान्य

5 सप्टेंबरला ऐतिहासिक दसरा चौकात दहीहंडी सोहळा

राजकीय रणधुमाळी सुरू असतानाच, धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीने येत्या 5 सप्टेंबर रोजी ऐतिहासिक दसरा चौकात 18 व्या दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी प्रथम क्रमांकासाठी 3 लाख रुपयांचे पारितोषिक असून, विशेष आकर्षण म्हणून 8 थर लावणाऱ्या गोविंदा पथकासाठी 1 लाख रुपयांचे स्वतंत्र बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

Maharashtra TimesMaharashtra Rain : महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कधी येणार? पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाजदहीहंडीला ‘साहसी खेळ’ म्हणून दर्जा मिळाल्याने गोविंदांच्या सुरक्षेसाठी 10 लाखांचा विमा आणि ‘हार्नेस’ सारखी अत्याधुनिक सुरक्षा साधने वापरली जाणार आहे. या सोहळ्याला पालकमंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत दादा पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा