Nepal Flood : नेपाळमध्ये सरकार मृतांचा आकडा मोजत आहे तर दुसरीकडे स्थानिक पैसे आणि सोने-चांदीची लूट करत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या स्थानिकांकडून ५७ लाख रुपये जप्त केले आहे. मृतांवरील सोने चांदी लुटण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोने-चांदी लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत ६०० हुन अधिक शव बाहेर काढले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

तिजोरीतून लुटलेले ५७ लाख जप्त
१० सप्टेंबर रोजी रसुवा येथील भोटेकोशी भागात पूर आला होता. या पुराच्या पाण्यात बँकेची तिजोरी वाहून धाडिंग जिल्ह्यातील गल्छी ग्रामीण नगरपालिका-४ मधील बेलखुखोला जवळ, त्रिशूळ नदीच्या काठावर सापडली. स्थानिक नागरिकांनी ती तिजोरी फोडली आणि पैसे घेऊन पळून गेले. १२ सप्टेंबर रोजी धाडींग पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांनी २९ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ९२,६८,५०५ नेपाळी पैसे म्हणजेच भारतीय ५७ लाख रुपये जप्त केले, अशी माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेले स्थानिक हे गल्छी-४ मधील ‘मास्टार’ येथील रहिवासी आहेत. काही जण गल्छी-६ मधील ‘आदमघाट’ आणि सिद्धलेख-७ मधील ‘आदमतार’ येथील आहे. तर काही आरोपी हे मूळ चित्वान आणि परसा येथील असून ते धाडींग येथील रहिवासी आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांची वय १९ ते ४९ वर्ष अशी आहे. पोलीस ही तिजोरी कुठून वाहत आली आणि यात आणखी काही स्थानिकांचा समावेश आहे का? याचा तपास करत आहे.
मृतांवरचे सोन्या-चांदीची चोरी
मृतांवरच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी करण्यात आल्याचे समोर आले आहे. नारायणी नदीच्या महापुरात वाहून आलेल्या मृतांवरील सोन्याचे कर्णफुले चोरल्याच्या आरोपावरून दोघांना ताब्यात घेतले आहे. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती महिलेच्या बॉडीमधून सोन्याचे कर्णफुले काढतांना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यांनतर पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.
आतापर्यंत शव सापडण्याचा आकडा वाढला
नेपाळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. ६२६ शव आतापर्यंत सापडले असून अद्याप २४२६ नागरिक बेपत्ता आहे. बेपत्तांमध्ये भारतीय आणि विदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. बेपत्ता असलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. नेपाळच्या मदतीसाठी भारताने तिसरे विमान काठमांडूकडे रवाना केले आहे. १० टन मानवी मदत आणि पोर्टेबल जनरेटर सेट, डिग्निटी किट्स, अन्नाची पाकिटे आणि पाणी शुद्ध करण्याच्या गोळ्या पाठवले आहेत. बोगद्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी एक बचाव पथक आणि तांत्रिक मदत देखील पाठवण्यात येणार आहे.

