Headlines

Vandana Gupte Interview;


Vandana Gupte Interview;सुप्रसिद्ध मराठी अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी अभिनयाच्या बळावर चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलंय. अनेक कलाकार त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असायचे. मराठी अभिनेत्री, वंदना गुप्ते यांनी डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत ‘सुंदर मी होणार’ या नाटकात काम केलं होतं. मात्र, या नाटकादरम्यानचा एक किस्सा वंदना गुप्ते यांनी शेअर केला.

Vandana Gupte Exclusive Interview:
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: आपल्या नैसर्गिक अभिनयाच्या बळावर मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे चतुरस्त्र अभिनेते, मराठी रंगभूमीचा अनभिषिक्त नटसम्राट , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांच्या अभिनयाची चर्चा आजही होते. लागू यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. कामाप्रती कमालीची निष्ठा आणि शिस्त यासाठी ओळखल्या जाणाऱ्या डॉ. लागू यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग त्यांचे सहकलाकार आज सांगताना दिसतात. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनीही लागू यांच्यासोबत नाटकात काम केलं. या नाटकादरम्यानचा एक भावूक किस्सा नुकताच त्यांनी शेअर केला. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या सेलिब्रिटी कॉर्नर या खास मुलाखतीत त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी नाट्य तसंच सिनेविश्वातील अनेक आठवणी शेअर केल्या, त्यांची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे.

Maharashtra TimesOmkar Karve On Producer : ‘इंडस्ट्रीला लागलेली किड, तो नुसत्या शिव्या घालत नाही तर लाथाबुक्क्यांनी मारतो’, मराठी अभिनेत्याचे निर्मात्यावर गंभीर आरोपगेल्या काही वर्षात प्रेक्षकांमधून आलेल्या आवाजामुळे, फोन वाजल्यामुळे सुरू असलेल्या प्रयोगात कलाकार व्यक्त होतात. प्रयोग थांबवून प्रेक्षकांना बोल लावतात, याबद्दल बोलत असताना त्यांनी प्रयोग सुरू असताना तुमच्या डोक्यात दुसरे विषय यायलाच नको, असं म्हटलं. पूर्ण एकाग्रता महत्त्वाची आहे, असंही त्यांनी म्हटलं. हे सांगत असतानाच त्यांनी डॉ. श्रीराम लागूंचा एक किस्सा सांगितला.

‘सुंदर मी होणार’ नाटकादरम्यानचा किस्सा

‘सुंदर मी होणार’ या प्रसिद्ध नाटकाच्या प्रयोगादरम्यानचा एक प्रसंग वंदना गुप्ते ंनी सांगितला. वंदना गुप्ते यांनी सांगितलं की, हे नाटक सुरू असतानाच डॉ. लागू यांच्या तरुण मुलाचं (तन्मय) अपघाती निधन झालं होतं. या दुःखाच्या डोंगरातून सावरत, मुलाच्या निधनानंतर अवघ्या १० दिवसांत डॉ. लागूंनी नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरू केले.

Maharashtra TimesPrasad Khandekar : ‘तुझ्याबरोबर हसता येतं, मनातलं बोलता येतं, काहीही न बोलताही खूप काही समजतं’, नम्रता संभेरावसाठी प्रसादची खास पोस्ट

मुलाच्या निधनानंतरचा हा पहिलाच प्रयोग. प्रयोग सुरू असताना अचानक स्टेजवर डॉ. लागू १० सेकंदांसाठी शांत झाले आणि ब्लँक झाले होते. मुलांविषयीची ती वाक्ये होती प्रयोग सुरू असताना १० सेकंदांची शांतता ही खूप मोठी वाटते. प्रेक्षकांनाही नेमकं काय झालं ते समजलं होतं, त्यांनाही जाणीव झाली होती की डॉक्टर आपल्या मुलाच्या आठवणीत हरवले आहेत. मी त्यांच्या बाजूलाच होते. त्यांचा हात हातात घेतला, त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरले आणि प्रयोग पूर्ण केला. पण मध्यंतराच्या वेळी डॉ. श्रीराम लागू यांनी जे केले ते पाहून सर्वच सहकलाकार स्तब्ध झाले.

डॉ. लागूंनी मध्यंतराच्या वेळी वंदना गुप्ते, सुमुखी, प्रशांत, कविता या सर्व सहकलाकारांना मध्यभागी उभं केलं आणि थेट लोटांगण घातलं. डोळ्यात अश्रू आणून ते म्हणाले, “माझ्याकडून आज अक्षम्य गुन्हा घडला आहे. मी नाटकाच्या बाहेरच्या गोष्टीचा विचार स्टेजवर केला आणि ब्लँक झालो. मला तुम्हा सर्वांची माफी मागायची आहे. मुलाच्या विरहाचे प्रचंड दुःख पाठीशी असतानाही, अभिनयातील अवघ्या १० सेकंदांच्या चुकीसाठी सहकलाकारांचे पाय धरणारे डॉ. श्रीराम लागू यांचे हे रूप पाहून सगळेच गलबलून गेले. कला आणि कामाप्रती असलेली निष्ठा काय असते, याचा एक धडा डॉ. लागूंनी त्या दिवशी आम्हाला दिला, अशी आठवण वंदना गुप्ते यांनी अत्यंत भावुक होऊन सांगितली.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा