Nepali Woman Ramaiya Tamang refused to leave Home for bedridden husband in Nepal Floods; माझा नवरा अंथरुणाला खिळलाय, त्याला सोडून एकटी कशी जगू? महाप्रलयाचे इशारे, नेपाळी महिलेचा घराबाहेर पडण्याच इन्कार
Nepali Woman Ramaiya Tamang refused to leave Home for bedridden husband in Nepal Floods; माझा नवरा अंथरुणाला खिळलाय, त्याला सोडून एकटी कशी जगू? महाप्रलयाचे इशारे, नेपाळी महिलेचा घराबाहेर पडण्याच इन्कार
Ramaiya Tamang : पती अंथरुणाला खिळलेले आहेत आणि चालू शकत नाहीत, या काऱणास्तव महाप्रलयाचा इशारा मिळाल्यानंतर चिंता वाढत असतानाही ही महिला घर सोडून जाऊ इच्छित नाही
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पोखरा : २६ ऑगस्टच्या सकाळी नेपाळमधील त्रिशूली नदीच्या ७२ किलोमीटरच्या पट्ट्यात अचानक आलेला पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे अनेक ठिकाणी डझनभर वस्त्या उद्ध्वस्त झाल्या. यामुळे रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली. पुराचा नवीन इशारा मिळाल्यानंतर चिंता वाढत असतानाच, त्रिशूली बाजारातील एक महिला घर सोडून जाण्यास तयार नाही.
आजूबाजूला वस्त्या उद्ध्वस्त
महिला आपले घर सोडून जाऊ शकत नाही, कारण तिचे पती अंथरुणाला खिळलेले आहेत आणि चालू शकत नाहीत. उत्तर नेपाळमधील नुवाकोट जिल्ह्यातील एकेकाळी गजबजलेले व्यापारी शहर असलेल्या त्रिशूली बाजाराची अवस्था आता चिखल, ढिगारा, उद्ध्वस्त घरे आणि सर्वत्र पसरलेल्या विध्वंसात बदलली आहे.
नेपाळच्या काही भागांत संभाव्य पुराचा इशारा देणारी नवीन सूचना जारी झाल्यानंतर पत्रकार सिक्ता देव यांनी त्रिशूली बाजार परिसराला भेट दिली. आदल्या दिवशी लोक बेपत्ता असलेल्या आप्तांबद्दलची माहिती, बचाव पथके आणि नुकसानग्रस्त घरे व सामानाबद्दलच्या बातम्यांची वाट पाहत होते; त्या तुलनेत आता त्रिशूली बाजार परिसरात बऱ्याच अंशी शांतता होती.
इशारा मिळाल्यानंतरही हा परिसर का सोडला नाही, असे विचारले असता रमैया तमांग म्हणाल्या, “माझे पती वृद्ध आहेत आणि ते चालू शकत नाहीत. त्यामुळेच मी हे ठिकाण सोडून सुरक्षित ठिकाणी जाऊ शकत नाही. काहीही झाले तरी मला इथेच राहावे लागेल.”
रमैया तमांग आणि त्यांचे पती यापूर्वीही एका विनाशकारी पुराचा सामना करुन वाचले आहेत; त्या पुरात घरे, दुकाने आणि घरातील सामान वाहून गेले होते. घरात असतानाच त्यांनी पुराचे पाणी जवळ येताना पाहिले होते.
स्थलांतर करायचं तर पतीचं काय होईल
आता पुन्हा एकदा पुराचा इशारा मिळाल्याने रमैया तमांग यांच्यासमोर तेच संकट उभे राहिले आहे. त्यांना सर्वात जास्त काळजी या गोष्टीची आहे की, जर त्यांना सुरक्षित स्थलांतर करावे लागले तर त्यांच्या पतीचे काय होईल. जी कुटुंबे आणीबाणीच्या काळात सहजपणे सुरक्षित ठिकाणी पोहोचू शकत नाहीत, अशा असुरक्षित कुटुंबांच्या अडचणी त्यांची ही परिस्थिती अधोरेखित करते.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा