Headlines

Kangana Ranaut : ‘कित्येक लोकांसाठी मोदी देव आहेत, त्यांच्या भावना दुखावू नका’; कंगनाचं आणखी एक विधान चर्चेत


Kangana Ranaut Post : कंगना रणौतनं सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर केली असून अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

Kangana Ranaut On Narendra Modi
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – कंगना रणौतनं सोशल मीडियावर एक ‘सेल्फी-स्टाईल’ व्हिडिओ पोस्ट केला आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये कंगनानं NEET-UG 2026 पेपरफुटीच्या मुद्द्यावरून CJP च्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनावर टीका केली आहे.

इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करत कंगनानं लिहिलं की, ‘आपल्या पंतप्रधानांकडून प्रेरणा घेऊन मी हा सेल्फी व्हिडिओ पोस्ट करत आहे. माझ्या विचारांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. तसेच गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.’
Maharashtra TimesAishwarya Narkar : ‘या वयात शोभतं का?’, सोशल मीडियावर ट्रोल; ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, ‘लोक काय म्हणतील हा मुद्दाच आयुष्यात ठेवू नका’

कंगना रणौतची पोस्ट

कंगना म्हणाली की, ‘ही रील मी सोशल मीडियासाठी बनवतेय. काही आंदोलक आक्षेपार्ह कृत्य करत होते, त्याबद्दल मी माझं मत मांडलेलं. पण, त्यावरही आक्षेप घेण्यात आला. आमच्या घरातील मुलांनी अशा घाणेरड्या आणि अश्लील कृत्यांचं अनुकरण करू नये, असं मला वाटतं. सोशल मीडियावर माझ्याविरुद्ध बोललं जातंय. पण, मी नीटच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलेल्या, हे नाही दाखवण्यात आलं. मात्र, काही फॉलोअर्स आणि कमेंट्ससाठी सोशल मीडियावर माझ्याविरोधात बोललं जातंय.’

Celebrity Corner : प्रशांत दामलेंसह ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा

कंगना पुढे म्हणाली की, ‘काही स्त्रीवादी विचारसरणीच्या महिलासुद्धा मला शिकवण्याचा प्रयत्न करतायत. तुम्हाला जर समाजात राहायचं असेल तर संविधानाप्रमाणे राहावं लागेल. माझं नाक आणि कान जिथून सुरू होतं, तिथे तुमचं स्वातंत्र्य संपतं. त्यामुळे तुम्ही फक्त घरातच बसून राहू शकता. माझ्या घरच्यांना बोलण्याचा तुम्हाला हक्क नाही.’

‘तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही विद्यार्थी ‘एक्झाम बडी’ म्हणतात. त्यांच्यासोबत अनेकांच्या भावना जोडलेल्या आहेत. कोण त्यांना मित्र मानतं, कोणी त्यांना देव मानतं, त्यामुळे तुम्ही त्यांच्या भावना दुखावू नाही शकत. हा सिविक सेन्स नाहीये, तुम्हाला तो शिकला पाहिजे. तुम्ही तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. तुम्हाला ठरवायचंय कोण योग्य आणि अयोग्य. आपल्याला हे आयुष्य विकसित होण्यासाठी मिळालं आहे, हेच मी माझ्या गुरूंकडून शिकली आहे.’ असं म्हणत कंगनानं सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कंगनाची ही पोस्टसुद्धा आता चर्चेचा विषय ठरली आहे.