Headlines

Swine Flu Cases Nashik: नाशिककरांनो सावधान! शहरात वाढला स्वाइन फ्लूचा धोका, तिघांचा करुण अंत, 43 रुग्ण पॉझिटिव्ह


Swine Flu Cases Nashik: नाशिकमध्ये स्वाइन प्लूचा धोका वाढला असून तिघांचा मृत्यू झाला, तर ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.

Anderson Phillip Catch - 2026-08-11T112703
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: जुलै महिन्यातील मुसळधार पावसानंतर शहरात डेंग्यू आणि साथीच्या आजारांबरोबरच स्वाईन फ्लूचे संकटही उभे ठाकले आहे. शहरासह लगतच्या ग्रामीण भागात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला असून, आतापर्यंत ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील ६९ वर्षीय वृद्धा, पिंपळणारे येथील ५५ वर्षीय पुरुष आणि नाशिक शहरातील आडगाव परिसरातील ६६ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.

जानेवारीपासून आतापर्यंत तापसदृश आजार असलेल्या ६८,१२२ नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यापैकी २२९ जणांना स्वाइन फ्लूसदृश लक्षणे आढळल्याने त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातून ४३ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या १२ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत असून, २८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

Maharashtra TimesHemlata Patil : चार महिन्यांपूर्वी बांधलेला रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला, NCP नगरसेविका हेमलता पाटलांचा संताप, काम बंद पाडत जाब विचारलाजानेवारी ते जून या सहा महिन्यांत स्वाइन फ्लूचे केवळ सात रुग्ण होते. मात्र, जुलैपासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. जुलैमध्ये २१, तर ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांत १५ नवे रुग्ण आढळले. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक शहरातील ३० आणि ग्रामीण भागातील १३ रुग्णांचा समावेश आहे.

“स्वाइन फ्लूची स्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरू नये. लक्षणे दिसताच त्वरित रुग्णालयात उपचार घ्यावेत,” असे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रशांत शेटे यांनी सांगितले.

Maharashtra TimesMithilesh Desai : पंतप्रधानांच्या शेजारी उभा, कोकणातील ‘फणस किंग’च्या मोदींशी गप्पा, रेवती सुळेंच्या रिसेप्शनमध्ये मिथिलेश देसाईने लक्ष वेधलंवणी-सापुतारा रस्त्यावर पांडाणेजवळ सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार मंगेश पांडू कराटे (४९, रा. खोबळा, ता. सुरगाणा) यांचा जागीच मृत्यू झाला. विजय शेखरे (२१) व रेखाबाई विजय शेखरे (२०) गंभीर जखमी झाले असून, रेखाबाई यांची प्रकृती चिंताजनक आहे. कारचालकासह कारमधील एक जणही जखमी असल्याची माहिती आहे. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने ती जळून खाक झाली. जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वणी पोलिस तपरत करीत आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा